Surya Grahan 2026: ते म्हणतात ना, माणसाच्या आयुष्यात तो योग यावा लागतो, मग गोष्टी आपोआप सुरळीत व्हायला लागतात. ज्योतिषशास्त्रानुसार, 17 फेब्रुवारीला अशीच एक खगोलीय घटना घडणार आहे, ज्याचा परिणाम अनेकांच्या जीवनावर होईल. सूर्यग्रहण ही एक अशी महत्त्वाची खगोलीय घटना आहे, ज्याचा परिणाम व्यक्ती आणि जागतिक स्तरावर जाणवतो. 2026 मध्ये, हे ग्रहण मंगळवार, 17 फेब्रुवारी रोजी होईल. जो माघ महिन्यातील अमावस्येचा दिवस असेल. ज्योतिषींच्या मते, हे सूर्यग्रहण तब्बल 8 राशींचं भाग्य पालटणार आहे, जाणून घ्या त्या भाग्यशाली राशींबद्दल...

वर्षातील पहिले ग्रहण कोणत्या राशींना फायदेशीर ठरेल? (Surya Grahan 2026)

ज्योतिषशास्त्रानुसार, 17 फेब्रुवारी रोजी सूर्यग्रहण होत आहे. त्यामुळे काही राशींना संधी मिळतील, तर काहींना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जाईल. वैदिक पंचांगानुसार, सूर्यग्रहण संध्याकाळी 5:26 ते 7:57 पर्यंत राहील. हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक काळ पाळला जाणार नाही, ग्रहांच्या स्थितीमुळे, त्याचा ज्योतिषीय प्रभाव सर्व 12 राशींवर पडू शकतो. याचा काही राशींना फायदा होऊ शकतो, तर काहींच्या समस्या वाढू शकतात. वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाचा 12 राशींवर काय परिणाम होईल ते जाणून घेऊया....

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, हे ग्रहण मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकते.तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

कर्क (Cancer)

ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते.मुलांशी किंवा कुटुंबाशी संबंधित चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.जर कोणतेही काम अडकले असेल तर ते पूर्ण होऊ शकते.तुमच्या सर्व प्रयत्नांमधून तुम्हाला मानसिक समाधान मिळेल.

कन्या (Virgo)

ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे.तुम्हाला नवीन घर, वाहन किंवा काहीतरी विशेष मिळू शकते.तुमच्या नोकरीत प्रगती आणि पदोन्नतीची शक्यता आहे.

तूळ (Libra)

ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या लोकांसाठी हा प्रभावशाली काळ असेल.तुमच्या शब्दांचा इतरांवर प्रभाव पडेल.समाजात आदर वाढेल आणि तुम्ही नवीन लोकांना भेटाल.प्रेम संबंध मजबूत होतील आणि तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

वृश्चिक (Scorpio)

ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा शुभ काळ असेल.जुने वाद संपू शकतात.आर्थिक लाभाच्या संधी मिळतील आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल.कोणीतरी खास व्यक्ती भेटीला येऊ शकते.

धनु (Sagittarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीसाठी नफा मिळण्याची शक्यता आहे.करिअरमध्ये यश आणि व्यवसायात विस्तार शक्य आहे.प्रवास फायदेशीर ठरू शकतो.तुम्हाला कामाशी संबंधित अडचणी येऊ शकतात.

मकर (Capricorn)

ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीसाठी प्रगतीचे संकेत आहेत.दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होतील.तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल.

मीन (Pisces)

ज्योतिषशास्त्रानुसार, हे ग्रहण मीन राशीसाठी फायदेशीर राहील.अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.कुटुंबात आनंद आणि शांती नांदेल.तुमच्या प्रियकराला भेटण्यात अडचणी येऊ शकतात.

हेही वाचा

Shani Ast 2026: धनलाभाचे दरवाजे उघडणार! मार्चमध्ये 4 राशींच्या पाठीशी शनिचं प्रचंड पाठबळ, शनि अस्ताने कष्टाचं मिळणार फळ, हीच ती वेळ..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)