Surya Grahan 2025: नुकतेच 7 सप्टेंबर रोजी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण झाले. आता वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण येण्याची वेळ आहे. 2025 च्या दुसऱ्या आणि शेवटच्या सूर्यग्रहणासाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत, ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर त्याचा 5 राशींवर सर्वाधिक परिणाम होईल. तर काही राशींना सोन्याचे दिवस येणार असल्याचं म्हटलं जातंय. जाणून घेऊया या सूर्यग्रहणात कोणाला काळजी घ्यावी लागणार? कोणाला लॉटरी लागणार?
सूर्यग्रहणाच्या काळात 'या' 5 राशींनी सर्वात जास्त सांभाळून राहा
ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर महिन्यात 15 दिवसांत 2 ग्रहणे होत आहेत. 7 सप्टेंबर रोजी शनीच्या कुंभ राशीत चंद्रग्रहण झाले आहे. आता 21 सप्टेंबर रोजी कन्या राशीत सूर्यग्रहण होणार आहे. 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाचा परिणाम सर्व 12 राशींवर होईल, परंतु काही राशींवर त्याचा जास्त परिणाम होईल.
सूर्यग्रहण कधी होणार?
वैदिक पंचांगानुसार 21 सप्टेंबर रोजी 2025 मधील दुसरे सूर्यग्रहण सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी होईल. हे एक आंशिक सूर्यग्रहण असेल, जे 21 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता भारतात सुरू होईल आणि 22 सप्टेंबर रोजी पहाटे 03.24 वाजता संपेल.
हे सूर्यग्रहण भारतात दिसणार का? सुतक काळ वैध राहील?
हिंदू दिनदर्शिकेनुसार, 21 सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सुतक काळही वैध राहणार नाही. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार, या सूर्यग्रहणाचा राशींवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काही राशींना फायदा होईल तर काहींना नुकसान होईल.
सूर्यग्रहण कुठे दिसेल?
हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरी, 2025 चे हे सूर्यग्रहण न्यूझीलंड, फिजी, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागरात दिसेल.
सूर्यग्रहणाचा कोणत्या राशींवर परिणाम होणार?
पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी होणारे हे सूर्यग्रहण कन्या आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात होईल, ज्याचा परिणाम सर्व १२ राशींवर होईल. या सूर्यग्रहणाचा मिथुन, कन्या आणि मीन राशींवर अशुभ परिणाम होऊ शकतो. या लोकांना करिअर, वैयक्तिक जीवन, संपत्ती, आरोग्य आणि नातेसंबंधांशी संबंधित समस्या येऊ शकतात. विशेषतः कन्या राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कारण या राशीत सूर्यग्रहण होत आहे. या लोकांनी वाद टाळावेत आणि गुंतवणूक करू नये.
ग्रहण 2 राशींसाठी शुभ
ज्योतिषशास्त्रानुसार, हे सूर्यग्रहण वृषभ आणि तूळ राशीसाठी शुभ ठरू शकते. या लोकांना पैसे आणि करिअरमध्ये वाढ मिळेल.
हेही वाचा :
Weekly Horoscope: अखेर सप्टेंबरचा नवा आठवडा सुरू! पितृपक्षाचा काळ 'या' 4 राशींसाठी टेन्शनचा? मेष ते मीन 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)