Surya Grahan 2024 : 2024 हे वर्ष लवकरच सुरू होणार आहे. नववर्षातील सूर्यग्रहणाबद्दल बोलायचे झाले तर, 2024 मध्ये दोन ग्रहणे होणार आहेत. 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण होणार आहेत. 2024 मध्ये होणारी दोन सूर्यग्रहण भारतात दिसणार आहेत की नाही? हे जाणून घेऊया. तसेच सुतक काळातील ग्रहणाची तारीख आणि वेळ देखील जाणून घ्या.
2024 च्या पहिल्या सूर्यग्रहणाची तारीख आणि वेळ जाणून घ्या
2024 मध्ये होणारे पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण रात्री 9:12 वाजता सुरू होईल आणि दुपारी 1:25 वाजता संपेल. या ग्रहणाचा एकूण कालावधी 4 तास 39 मिनिटे असेल. त्याचा सुतक कालावधी 8 एप्रिल रोजी सकाळी 9.12 वाजता सुरू होईल. वास्तविक, सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी 12 तास आधी सुरू होतो.
2024 सालचे पहिले सूर्यग्रहण कुठे दिसणार?
मात्र, हे ग्रहण दक्षिण पश्चिम युरोप, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुवावर दिसणार आहे. हे भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सुतक काळही भारतात वैध राहणार नाही.
2-3 ऑक्टोबर रोजी 2024 वर्षातील दुसरे सूर्यग्रहण
2024 सालचे दुसरे सूर्यग्रहण 2 आणि 3 ऑक्टोबरच्या मध्यरात्री होणार आहे. 2024 वर्षातील दुसरे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार 2 ऑक्टोबर रोजी रात्री 9:13 ते 3:17 पर्यंत राहील. ग्रहणाचा एकूण कालावधी 6 तास 4 मिनिटे असेल. दुसऱ्या सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी 2 ऑक्टोबरला सकाळी 9.13 वाजता सुरू होईल.
2024 चे दुसरे सूर्यग्रहण कुठे दिसणार?
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण अमेरिका, आंशिक दक्षिण अमेरिका, पॅसिफिक आणि अटलांटिक महासागर, दक्षिण ध्रुव येथे दिसणार आहे. ते भारतात अदृश्यच राहील. त्यामुळे त्याचा सुतक काळही भारतात वैध ठरणार नाही.
सूर्यग्रहण कसे होते?
जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा चंद्राच्या मागे सूर्याची प्रतिमा काही काळ पूर्णपणे झाकलेली असते. या प्रक्रियेलाच सूर्यग्रहण म्हणतात. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आल्याने प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे पृथ्वीचा काही भाग दिवसाच्या प्रकाशात काही काळ गडद दिसतो. शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Love Horoscope 2024 : 5 राशींसाठी 2024 असेल खूप खास! त्यांच्या आयुष्यात फुलणार प्रेम, जाणून घ्या त्या राशी