Surya Grahan 2024 : हिंदू धर्मानुसार, सूर्य ग्रहणाचं (Surya Grahan) महत्त्व फार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य ग्रहण नेहमी अमावस्येच्या (Amavasya) दिवशीच असते. चंद्र ग्रहणाच्या 9 तासापूर्वी सूतक काळ लागतो तर, सूर्य ग्रहणाच्या 12 तासांपूर्वी सुतक काळ सुरु होतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, सूतक काळात धर्म, कर्म आणि शुभ कार्य करणं वर्जित मानलं जातं. जर या काळात शुभ कार्य केलं तर, त्याचा दोष लागतो. सूतक काळात शुभ कार्य केल्याने तसेच, लागलेले दोष दूर करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले जातात. 2024 वर्षातलं दुसरं आणि शेवटचं सूर्य ग्रहण पितृ (Pitru paksha 2024) विसर्जन अमावस्येच्या दिवशी होणार आहे.
पितृ विसर्जन अमावस्येच्या दिवशी ज्ञात-अज्ञात पितराचं तर्पण, पिंडदान, कर्मकांड केलं जातं. ज्यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो. त्याचप्रमाणे, या दिवशी पितरांना शास्त्रात सांगितलेल्या विधीनुसार, निरोप देखील दिला जातो. पितृ विसर्जन अमावस्येच्या दिवशी सूतक काळ सकाळी 9.03 पासून प्रारंभ होणार आहे. याच निमित्ताने या दिवशी पितरांचं तर्पण, पिंडदान कसं करावं.
सूर्य ग्रहणाची वेळ
ज्योतिष शास्त्रानुसार, 2 ऑक्टोबर रोजी अश्विन महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी सूर्य ग्रहण रात्री 9.13 पासून सुरु होणार आहे. हे सूर्य ग्रहण 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 3 वाजून 17 मिनिटांपर्यंत असमार आहे. तर, सूतक काळाचा प्रारंभ 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.13 वाजता सुरुवात होईल. 2024 चं हे सूर्य ग्रहण भारताच्या वेळेनुसार, रात्रीच्या वेळी होणार आहे. हे सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही.
सूर्य ग्रहणात भारतावर कसा होणार परिणाम?
शास्त्रानुसार, या सूर्य ग्रहणाचा भारतावर कोणताच परिणाम होणार नाही. त्यामुळे याचा सूतक काळ देखील भारतात मान्य होणार नाही. तसेच, या दिवशी व्यक्तीद्वारा करण्यात आलेले कर्म धर्म आणि शुभ कार्याचा कोणताच दोष लागणार नाही. तर, व्यक्ती द्वारा करण्यात आलेल्या धर्म कर्म आणि शुभ कार्याचे शुभ फळ प्राप्त होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shani Dev : वृश्चिक राशीतून ढैय्याचा प्रभाव हटताच 'या' राशींचं नशीब उजळणार; अनेक स्त्रोतातून होणार धन-संपत्तीचा वर्षाव