Surya grahan 2023 : वर्षातील पहिले सूर्यग्रहण (Surya Grahan 2023) ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे सूर्यग्रहण खग्रास सूर्यग्रहण असेल. सूर्यग्रहणानंतर गुरू या शुभ ग्रहाच्या राशीत बदल होईल, ज्यामुळे सूर्यग्रहणाचा प्रतिकूल प्रभाव कमी होईल, परंतु त्याचा सर्वाधिक परिणाम 4 राशींवर दिसून येईल. जाणून घ्या सविस्तर



वर्षातील पहिले सूर्यग्रहण कधी होणार?


2023 मधील पहिले सूर्यग्रहण गुरुवार, 20 एप्रिल रोजी मेष राशीत होणार आहे,  हे सूर्यग्रहण खग्रास सूर्यग्रहण असेल जे सुमारे 5 तास 24 मिनिटे चालेल. सूर्यग्रहणाच्या काळात सूर्य मेष राशीत असेल, तर सूर्यग्रहणानंतर अवघ्या दोन दिवसांनी गुरूची राशी बदलणार आहे. अशा स्थितीत वर्षातील पहिले सूर्यग्रहण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या सूर्यग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव ऑस्ट्रेलिया, फिलिपाइन्स, दक्षिण प्रशांत महासागर, न्यूझीलंड या देशांवर दिसून येईल. हे सुर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याने याचे वेधादि नियम पाळू नये असा सल्लाही ज्योतिषतज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.



सूर्यग्रहण वेळ
भारतीय वेळेनुसार, वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी सकाळी 07.05 पासून सुरू होईल. सूर्यग्रहणाची खग्रास 08.07 मिनिटांनी होईल. सूर्यग्रहणाच्या मध्यभागी म्हणजेच परमग्रास सकाळी 09:47 वाजता असेल. दुपारी 12.29 वाजता ग्रहण संपेल. सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 5 तास 24 मिनिटे असेल. इतके मोठे सूर्यग्रहण आणि सूर्य स्वतःच्या राशीत मेष राशीत असल्याने जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते.



मेष राशीवर सूर्यग्रहणाचा प्रभाव
जर आपण सूर्यग्रहणाच्या राशींवर होणाऱ्या प्रभावाबद्दल बोललो. तर वर्षातील पहिले सूर्यग्रहण मेष राशीच्या लोकांना थोडे त्रासदायक ठरेल. सूर्यग्रहण मेष राशीतच होणार आहे, अशा स्थितीत सूर्यग्रहणाचा विपरीत परिणाम होत असल्याने या राशीच्या लोकांना आरोग्याबाबत अधिक काळजी घ्यावी लागेल, तसेच त्यांना धोकादायक काम टाळावे लागेल, अन्यथा त्यांना त्रास होऊ शकतो. सूर्यग्रहणानंतर आर्थिक आणि करिअरच्या बाबतीतही तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. अधिका-यांच्या नाराजीसोबतच अपेक्षित बढती आणि लाभ न मिळाल्याने मानसिक अस्वस्थताही जाणवू शकते. तसेच, तुमच्या राशीत गुरूच्या आगमनाने तुम्हाला थोडा दिलासा मिळेल आणि तुम्ही जीवनात समतोल साधू शकाल.



सिंह राशीवर सूर्यग्रहणाचा प्रभाव
सूर्यग्रहणाच्या काळात सिंह राशीचा स्वामी सूर्य तुमच्या राशीत नवव्या स्थानात असेल. ग्रहणानंतर दोनच दिवसांनी गुरु तुमच्या भाग्यशाली स्थानात प्रवेश करेल. अशा परिस्थितीत हे सूर्यग्रहण तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. अशा परिस्थितीत पुढील 2 महिने संयमाने कोणताही निर्णय घ्यावा. यावेळी शिक्षण आणि करिअरमध्ये काही चढ-उतार होतील, परंतु शेवटी परिस्थिती अनुकूल राहील आणि तुम्हाला लाभही मिळतील. काही कामात अडकल्याने निराशा होऊ शकते. पदोन्नती आणि वेतनवाढ अपेक्षेप्रमाणे न झाल्याने मानसिक तणावही येऊ शकतो. काळजी घ्या



कन्या राशीवर सूर्यग्रहणाचा प्रभाव
20 एप्रिल रोजी होणारे वर्ष 2023 चे पहिले सूर्यग्रहण कन्या राशीपासून आठव्या भावात होणार आहे. अशा परिस्थितीत हे सूर्यग्रहण कन्या राशीच्या लोकांसाठी खूप उलथापालथ घडवून आणणार आहे. या राशीच्या लोकांनी प्रवास करताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. वस्तू हरवण्याची किंवा अडचणीत येण्याची शक्यता राहील. तुमच्या चुकीच्या सवयींमुळे तुम्हाला नुकसानही सहन करावे लागू शकते. अशी काही परिस्थिती निर्माण होईल ज्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होईल तसेच तुम्हाला खर्च करावा लागेल. तुम्हाला बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो, अन्यथा तुमचे विरोधक तुमच्या विरोधात जाऊ शकतात.


 


वृश्चिक राशीवर सूर्यग्रहणाचा प्रभाव


वर्षातील पहिले सूर्यग्रहण वृश्चिक राशीतून सहाव्या भावात होत आहे, अशा स्थितीत वृश्चिक राशीच्या लोकांना या सूर्यग्रहणापासून गुप्त शत्रू आणि विरोधकांची भीती राहील. कोणीतरी तुमचे आतून नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकते, त्यामुळे तुमच्या कामात काळजीपूर्वक लक्ष द्या. आरोग्याच्या दृष्टीनेही हे सूर्यग्रहण तुमच्या अनुकूल नाही. सर्दी आणि कफ सारख्या समस्यांनी बाधित होऊ शकते, त्यामुळे खाण्यापिण्याची काळजी घ्यावी लागेल. इजा आणि अपघात होण्याचीही शक्यता आहे. यावेळी अशी काही अशी परिस्थिती देखील उद्भवू शकते. ज्यामुळे तुम्हाला कर्ज घ्यावे लागेल. त्यामुळे आतापासूनच तुमचे बजेट संतुलित करायला सुरुवात करा.



मकर राशीवर सूर्यग्रहणाचा प्रभाव
वर्षातील पहिले सूर्यग्रहण मकर राशीसाठी अनुकूल नाही. मकर राशीपासून चौथ्या भावात सूर्यग्रहण असल्यामुळे या राशीच्या लोकांना पालकांच्या आरोग्याची चिंता सतावू शकते. ते या काळात खर्च करतील, इतर काही अनावश्यक खर्चही त्यांना त्रास देतील. सुखाची कमतरता जाणवेल. कामाशी संबंधित ताणही त्यांना त्रास देईल. हृदय, रक्ताशी संबंधित काही समस्या असल्यास, तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत अधिक गंभीर राहावे लागेल. श्‍वसनाचा त्रास होण्याचीही शक्यता असते. अशा स्थितीत आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे, लाभ होईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Mahashivratri 2023: महाशिवरात्रीला राशीनुसार पूजा करा, महादेव होतील प्रसन्न! जाणून घ्या कोणता मंत्र देईल यश?