Sun Transit : सूर्यदेवाला सर्व ग्रहांचा राजा संबोधलं जातं. सूर्यदेव दर महिन्याला राशी परिवर्तन करतात. ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला विशेष स्थान आहे. 15 जानेवारीला सुर्यदेवाने चाल बदलून मकर राशीत प्रवेश केला आहे आणि या राशीत सूर्यदेव 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत राहणार आहे. सूर्य महिनाभर मकर राशीत राहून काही राशींच्या लोकांवर आपली विशेष कृपादृष्टी ठेवेल.
सूर्याच्या शुभ प्रभावाने व्यक्तीचं नशीब उजळतं. ज्या व्यक्तीवर सूर्यदेवाची कृपा राहते, त्या व्यक्तीला जीवनात कोणत्याच समस्येचा सामना करावा लागत नाही. असं असताना येणारे 27 दिवस कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) शुभ ठरणार? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
सूर्याचं राशीबदल मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला जमीन आणि मालमत्तेच्या कामातून आर्थिक लाभ होईल. तुमचा समाजातील आदर वाढेल. कामाच्या ठिकाणी बॉस तुमच्यावर आनंदी राहील. कामात तुम्ही काही नवीन योजना आखाल, ज्या तुमच्या बॉसला आवडतील. हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे, तुमचे अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील. व्यवसायासाठी देखील हा काळ चांगला आहे. या काळात तुमची एखाद्या जुन्या मित्राशी भेट होऊ शकते.
मिथुन रास (Gemini)
सूर्याचं मार्गक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी प्रत्येक टप्प्यावर अनुकूल राहील. या काळात भाग्य तुमच्या सोबत राहील. तुम्हाला प्रलंबित पैसे परत मिळतील. हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील. तुम्हाला आजारांपासून लवकर आराम मिळेल. या काळात तुम्ही अशा काही नवीन योजना आखाल, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांना सूर्य खूप लाभ देईल. नोकरीत तुम्हाला बढती मिळू शकते किंवा नवीन चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे. तुमचे अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. तुम्हाला कोणत्याही चिंतेतून आराम मिळू शकतो. तुमच्या आर्थिक स्थितीत बदल होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. रिअल इस्टेटचे व्यवहार करू शकता. खरेदी-विक्रीमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्याचं मार्गक्रमण खूप चांगलं असणार आहे. तुम्ही घेतलेले निर्णय तुम्हाला मोठे फायदे देतील. या काळात तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही कोणाकडून कर्ज घेतलं असेल कर तुम्ही ते परत कराल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी अधिकारी खुश राहतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: