Surya Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य (Sun) ग्रह व्यक्तीची प्रतिष्ठा, मान-सन्मान आणि अहंकाराचं प्रतिनिधीत्व करतो. नुकतंच 15 जून 2025 रोजी सूर्य ग्रहाचं संक्रमण होणार आहे. सूर्याच्या संक्रमणाने कोणकोणत्या राशींना पुढच्या एक महिन्यापर्यंत सावध राहण्याची गरज आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
सूर्यग्रहाचं संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी फार आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुमची महत्त्वाची कामं अडकू शकतात. तसेच, मुलांना अभ्यासाच्या बाबतीत सावधानता बाळगण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायात तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक अडथळे येऊ शकतात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांनी एक महिन्यापर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच, या काळात कोणत्याही वादविवादापासून दूर राहा. समाजात तुमची प्रतिष्ठा डागाळली जाऊ शकते. तसेच, कोणत्याच प्रकारे पैशांची गुंतवणूक करु नका. अन्यथा तुम्हाला नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांचा या कालावधीत अहंकार वाढू शकतो. तसेच, वैवाहिक जीवनात अनेक अडथळे होऊ शकतात. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमचे सहकाऱ्यांबरोबर वाद होऊ शकतात. बिझनेसमध्ये नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या काळा तुम्ही सावध राहण्याची गरज आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ फार सावधानतेचा असणार आहे. तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. तसेच, आयुष्यात अनेक चढ-उतारांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. तुमच्या व्यवसायात तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
या राशीच्या लोकांनी सूर्याच्या संक्रमणाच्या कालावधीत आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, रागावर नियंत्रण ठेवा. आपल्या आरोग्याच्या बाबतीत देखील सतर्क राहण्याची गरज आहे. तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पैशांचा जास्त वापर करु नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :