Srawan 2022 : ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात सर्वांवर भोलेनाथच्या आशीर्वादांचा वर्षाव होतो. श्रावण महिन्यात ग्रहांचे बदल काही राशींसाठी खूप भाग्यवान ठरणार आहेत. येत्या 29 जुलै पासून श्रावण महिना सुरू होत आहे.
मेष : मेष राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना खास असतो. श्रावणात होणार्या मानसिक त्रासातून तुम्हाला मुक्ती मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात व्यस्त राहील.
कर्क : कर्क राशीच्या लोकांना श्रावण महिन्याच्या मध्यात काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. 7 ऑगस्ट 2022 रोजी विलासी जीवनाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह तुमच्या राशीत येत आहे. या काळात तुमचा खर्च वाढू शकतो. हे संक्रमण प्रेम आणि रोमान्सच्या दृष्टीने शुभ परिणाम देईल.
सिंह : श्रावण महिना तुमच्यासाठी खास असणार आहे. या महिन्यात सिंह राशीमध्ये खूप शुभ योग तयार होणार आहेत. 1 ऑगस्ट 2022 रोजी बुध तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे. बुध हा बुद्धिमत्ता, वाणी आणि व्यवसायाचा कारक देखील मानला जातो. ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आपल्या अधिकारांचा गैरवापर टाळा.
तूळ : श्रावण महिन्यात तूळ राशीच्या लोकांवर भगवान शिवाची कृपा वर्षाव होत आहे. या दरम्यान मन प्रसन्न राहील. वैवाहिक जीवनात मधुरता वाढेल. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मान-सन्मानातही वाढ होते. गुंतवणुकीतून नफाही मिळू शकतो. त्यामुले हा महिना तूळ राशिच्या लोकांसाठी खास आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या