Shani Dev : हिंदू धर्मात कार्तिक महिन्याला धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रात सांगितलेल्या 9 ग्रहांमध्ये कर्म दाता शनिला (Shani Dev ) खूप महत्वाचे स्थान आहे. शनिला न्याय अधिकारी देखील म्हटले जाते. कारण शनिदेव चांगले कर्म करणाऱ्यांना चांगले फळ देतात.
ज्या व्यक्तीवर शनिदेवाची कृपा असते, त्याच्या आयुष्यात कधीही संकट येत नाही. त्यांना प्रत्येक कामात यश मिळते. त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. दुसरीकडे, शनिदेव वाईट कर्म करणाऱ्यांना कठोर शिक्षा देतात. असे मानले जाते की ज्यांच्यावर शनिदेवाची वाईट दृष्टी असते त्यांचे जीवन त्रासदायक बनते. त्यामुळे कोणीही शनिदेवाला नाराज करू इच्छित नाही.
शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. शनिवारी काही उपाय केल्याने शनिदेव खूप प्रसन्न होतात असे मानले जाते. अशा स्थितीत कार्तिक महिन्यातील शेवटचा शनिवार 5 नोव्हेंबर रोजी आहे. हा शनिवार अनेक अर्थांनी खूप शुभ आहे. पंचांगानुसार हा शनिवार कार्तिक शुक्ल द्वादशी तिथी आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र आहे. यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी चंद्र मीन राशीत भ्रमण करेल. देव गुरु बृहस्पती येथे आधीच विराजमान आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा चंद्र आणि गुरूचा संयोग तयार होतो तेव्हा अत्यंत उत्तम आणि शुभ योग गजकेसरी योग तयार होतो. म्हणजेच या शनिवारी गजकेसरी योग तयार होणार आहे. अशा अत्यंत शुभ योगात शनिवारचे हे उपाय अतिशय लाभदायक आणि पुण्यकारक आहेत.
शनिवारचे उपाय (Shani Dev )
- या शनिवारी शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी करा हे उपाय
- शनिवारी शनि चालिसा आणि हनुमान चालीसाचे पाठन करा
- शनि मंत्राचा किमान एक महिना जप करा.
- शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्याची किमान सात वेळा प्रदक्षिणा करावी.
- भरड धान्य, लोखंड, काळे तीळ आणि काळा घोंगडी गरजू लोकांना दान करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या