Solar Eclipse 2023 : आज वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. यावेळी सूर्यग्रहण मेष राशीत असेल. हे सूर्यग्रहण खूप खास असणार आहे कारण 19 वर्षांनंतर हे सूर्यग्रहण मेष राशीत होणार आहे. हे ग्रहण मेष राशीतील कृष्ण पक्षातील अमावास्येला अश्विनी नक्षत्रात सुरु होईल. तसेच, या दिवशी दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते.


सूर्यग्रहणाची वेळ काय असेल? (Solar Eclipse 2023 Time)


आज म्हणजेच (20 एप्रिल) रोजी होणारे सूर्यग्रहण सकाळी 07:05 वाजता दिसणार आहे. तर, दुपारी 12.29 वाजता हे सूर्यग्रहण संपेल. सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 5 तास 24 मिनिटे असणार आहे. केतूचे नक्षत्र असलेल्या अश्विनी नक्षत्रात हे सूर्यग्रहण होईल.


कुठे दिसणार सूर्यग्रहण? 


सूर्यग्रहण दक्षिण प्रशांत महासागरातील चीन, अमेरिका, मायक्रोनेशिया, मलेशिया, फिजी, जपान, सामोआ, सोलोमन, ब्रुनेई, सिंगापूर, थायलंड, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, व्हिएतनाम, तैवान यांसारख्या देशांमध्ये दिसणार आहे. पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया, फिलीपिन्स, दक्षिण हिंदी महासागरात दृश्यमान होतील. भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण या देशांमध्ये सकाळी 07.05 ते दुपारी 12.29 पर्यंत राहील. मात्र, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 20 April 2023 : मेष, धनु, मकर राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य