Solar Eclipse 2023: वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी दिसणार आहे. खगोलशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, 100 वर्षात पहिल्यांदाच अनोखं सूर्यग्रहण दिसणार आहे. सूर्यग्रहण दिसणार असलं, तरी यावेळी ते सामान्य नसणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि तिघेही एका सरळ रेषेत असतात, त्यावेळी सूर्यग्रहण दिसतं. पण, यावेळच्या सूर्यग्रहणाला 'हायब्रीड सूर्यग्रहण' असं म्हटलं जात आहे. हायब्रीड सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय? आणि ते सामान्य सूर्यग्रहणापेक्षा कसं वेगळं ठरतं? हे सविस्तर जाणून घेऊयात... 


हायब्रीड सूर्यग्रहण म्हणजे काय?


मिळालेल्या माहितीनुसार, ग्रहण सकाळी 7:04 पासून सुरू होईल आणि 5 तास 24 मिनिटांपर्यंत असेल. तर त्यानंतर दुपारी 12:29 वाजता संपेल. हे सूर्यग्रहण खूप खास असणार आहे, कारण ते तीन रूपात दिसणार आहे. आंशिक, संपूर्ण आणि कंकणाकृती अशा तीन स्वरुपात हे सूर्यग्रहण दिसणार आहे. अशी घटना सुमारे 100 वर्षांत एकदाच पाहायला मिळते. अशा स्थितीत चंद्राचं पृथ्वीपासूनचं अंतर ना जास्त असत, ना कमी. 


सूर्यग्रहणाची वेळ


भारतीय वेळेनुसार, वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी सकाळी 07.05 पासून सुरू होईल. सूर्यग्रहणाची खग्रास 08.07 मिनिटांनी होईल. सूर्यग्रहणाच्या मध्यभागी म्हणजेच परमग्रास सकाळी 09:47 वाजता असेल. दुपारी 12.29 वाजता ग्रहण संपेल. सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 5 तास 24 मिनिटं असेल. 


सूर्यग्रहणाचे किती प्रकार आहेत?


सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत. पहिलं संपूर्ण सूर्यग्रहण, दुसरं आंशिक सूर्यग्रहण आणि तिसरं कंकणाकृती सूर्यग्रहण. 


1. आंशिक सूर्यग्रहण


आंशिक सूर्यग्रहणात, चंद्र पृथ्वीचा एक भाग पूर्णपणे व्यापतो. म्हणजेच ज्यामध्ये चंद्राची सावली पृथ्वीच्या फक्त एका भागाला व्यापते, संपूर्ण भाग झाकत नाही.


2. संपूर्ण सूर्यग्रहण


संपूर्ण सूर्यग्रहण ज्यावेळी दिसतं, त्यावेळी पृथ्वीचा एक भाग पूर्णपणे अंधारात जातो. असं तेव्हा होतं, ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो. संपूर्ण सूर्यग्रहण 100 वर्षांत केवळ एकदाच दिसतं. 


3. कंकणाकृती सूर्यग्रहण 


कंकणाकृती सूर्यग्रहण तेव्हा दिसतं जेव्हा चंद्र पृथ्वीपासून दूर असतो. अशा स्थितीत चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही, त्यामुळे सूर्य आगीच्या वलयासारखा दिसतो आणि आकारानंही लहान दिसतो. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Surya Grahan 2023: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' दिवशी, तारीख, वेळ, कोणत्या राशीवर पडणार प्रभाव? जाणून घ्या