Solar Eclipse 2022 : ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) ग्रहाच्या संक्रमणामुळे अनेक योग तयार होतात. सूर्यग्रहणाचा (Solar Eclipse) योग ऑक्टोबर महिन्यात होत आहे. तसेच हे वर्षातील दुसरे सूर्यग्रहण असून भारतात दिसणारे पहिले सूर्यग्रहण आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीमध्ये सूर्यग्रहण आहे. अशा परिस्थितीत या महिन्यात इतर अनेक ग्रहांचे संक्रमण होत आहे. विशेष योगायोग असा की यावेळी चंद्र, केतू, सूर्य, बुध आणि शुक्र हे पाच ग्रह तूळ राशीत राहणार आहेत. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगण्यात येतंय की, तूळ राशीत हे ग्रहण असेल. काही राशींवर याचा अशुभ प्रभाव पडणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत या 6 राशी
कन्या : या काळात कन्या राशीच्या लोकांचा अनावश्यक खर्च वाढेल. गुंतवणुकीबाबत कोणी विचार करत असेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घेऊनच कोणतीही कृती करावी; अन्यथा घाईघाईने घेतलेला निर्णय तुम्हाला आर्थिक अडचणीत आणू शकतो.
तूळ : तूळ राशीतील सूर्यग्रहणासोबतच चंद्र, केतू, सूर्य, बुध आणि शुक्र हे पाच ग्रहही या राशीत भ्रमण करतील. या राशींच्या लोकांवर संकटांचा डोंगर कोसळू शकतो. या काळात या लोकांना खूप त्रास सहन करावा लागू शकतो, मात्र अशा परिस्थितीत आपली आर्थिक परिस्थिती संतुलित ठेवा. आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो, त्यामुळे खाण्यापिण्यात विशेष काळजी घ्या. तसेच वाहन चालवताना काळजी घ्या.
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांवर सूर्यग्रहणाचा प्रभाव अधिक दिसून येईल. या काळात वृषभ राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. यासोबतच त्या व्यक्तीला इतर काही समस्या असतील तर ते वेळीच निदान करणे योग्य ठरेल.
मिथुन: सूर्यग्रहण आणि इतर ग्रहांच्या राशी बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांना जास्त मेहनत करावी लागेल. परिश्रमाचे फळ व्यर्थ जाणार नाही, परंतु या काळात यशासाठी संघर्ष करावा लागू शकतो. उत्पन्नापेक्षा खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खर्च करण्यापूर्वी विचार करा.
वृश्चिक: या राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होईल. तुम्हाला पैशांबाबत तणाव जाणवू शकतो. त्यामुळे गरज नसल्यास तेथे जास्त पैसे खर्च करू नका. तसेच, गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.
मकर: सूर्यग्रहणासह 5 ग्रहांचे संक्रमण मकर राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते. या काळात तुमचे झालेले काम बिघडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अत्यंत विचारपूर्वक निर्णय घ्या. तसेच तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, काही जुन्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. कामात घाई टाळा, नाहीतर चालू असलेले काम बिघडू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्वाच्या बातम्या
October Panchak 2022 : 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार 'पंचक', चुकूनही करू नका 'हे' काम
Guru Margi 2022 : दिवाळीनंतर 'या' राशींवर राहिल गुरुची कृपा, सुख आणि समृद्धी मिळेल