Siddhivinayak Temple Laddu Controversy : मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातून (Siddhivinayak Temple) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादात उंदरांची पिल्लं आढळली आहेत. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला, यानंतर मंदिर परिसरातील स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Continues below advertisement


तिरुपती प्रसादाचा वाद ताजा असतानाच नव्या वादाला तोंड


नुकताच आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूंमध्ये जनावरांची चरबी मिसळल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोवर आता सिद्धीविनायक मंदिरातील प्रसाद शुद्धतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.


प्रसादाच्या पाकिटांवर दिली उंदराने पिल्लं


समोर आलेल्या व्हिडीओनुसार, सिद्धीविनायक प्रसादाच्या पाकिटांवर उंदराची पिल्लं दिसत आहेत. लाडूच्या प्रसादाच्या टोपलीतच उंदराने पिल्लं दिली आहेत. प्रसादाचे लाडू उंदरांनी कुरतडल्याचाही आरोप आता होत आहे. दरम्यान, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने हे आरोप फेटाळले आहेत.


प्रसादाचे लाडू उंदरांनी कुरतडल्याचाही आरोप


सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. समोर आलेला व्हिडीओ मंदिर परिसरातील नसून यामागे कोणाचं तरी षडयंत्र असल्याचं सरवणकर म्हणाले. कोणीतरी प्लॅस्टिकमध्ये उंदीर घालून ते प्रसादात ठेवले आणि त्याचा व्हिडीओ काढला असावा, असं सरवणकर म्हणाले. मंदिर परिसरात नेहमी स्वच्छता असल्याचंही ते म्हणाले.




प्रसादाच्या टोपलीत उंदीर प्रकरणाची तपासणी होणार


सिद्धीविनायक प्रसादाच्या टोपलीत उंदीर आढळळ्याच्या प्रकरणाची चौकशी होणार, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. मंदिर प्रशासन देखील घडलेल्या प्रकराची तपासणी करेल आणि योग्य ते स्पष्टीकरण देईल, असंही मुनगंटीवार म्हणाले. व्हायरल फोटो आणि व्हिडिओची देखील तपासणी होणार आहे.


प्रसादासाठी दररोज 50 हजार लाडू तयार केले जातात


सिद्धिविनायक मंदिरात दररोज सुमारे 50 हजार लाडू रोज बनवले जातात. प्रसादाच्या एका पाकिटात प्रत्येकी 50 ग्रॅमचे दोन लाडू असतात. सणासुदीच्या काळात प्रसादाची मागणी वाढते. प्रयोगशाळेच्या चाचणी अहवालानुसार, हे लाडू सात ते आठ दिवस साठवता येतात.


मंदिरातील स्वच्छता आणि शुद्धतेवर प्रश्नचिन्ह


लॅब टेस्टनुसार, हे महाप्रसादाचे लाडू 7 ते 8 दिवस सुरक्षित ठेवता येतात. मात्र, लाडूंमध्ये उंदरांची पिल्लं आढळून आल्याने मंदिरातील प्रसादाच्या स्वच्छता आणि शुद्धतेबाबत मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. 


हेही वाचा :


Tirupati Laddu : तिरुपती प्रसादाच्या लाडूत आढळली प्राण्यांची चरबी; नेमके कसे तयार होतात हे लाडू? 300 वर्षांपासूनची परंपरा काय?