Shukra Shani Yuti : ज्योतिष शास्त्रात कर्मफळदाता शनी (Shani Dev) आणि शुक्र (Venus) ग्रह या दोन्ही ग्रहाला फार लाभकारी मानलं जातं. ज्या लोकांच्या कुंडलीत या दोन्ही ग्रहांची स्थिती मजबूत असते त्या राशींना श्रीमंत होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाहीत. तर, जेव्हा या दोन्ही ग्रहांची युती होते तेव्हा तो फार शुभ काळ मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, तब्बल 30 वर्षांनंतर 2026 च्या मीन राशीत या दोन्ही ग्रहांची युती होणार आहे. यामुळे तीन राशींसाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे. 

Continues below advertisement


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनी ग्रहाची युती फार लाभदायी ठरणार आहे. या काळात उत्पन्नाचे अनेक नवे मार्ग तुमच्यासाठी खुल होतील. गुंतवणुकीसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. तसेच, समाजात तुमची पद-प्रतिष्ठा दोन्ही वाढेल. ज्या लोकांना नोकरीत प्रमोशन मिळालं नाहीये त्यांना लवकर प्रमोशन मिळेल. कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण घेऊ नका. अन्यथा याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. नियमित योग, व्यायाम करणं आरोग्यासाठी लाभदायी ठरेल. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीसाठी शुक्र आणि शनि ग्रहाची युती फार लाभदायी ठरणाप आहे. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक नवीन मार्ग खुले झालेले दिसतील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तसेच, या काळात तुम्ही नवीन नोकरी, वाहन किंवा एखादी वस्तूची खरेदी करु शकता. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्यासाठी हा काळ फार आनंददायी ठरणार आहे. 


मीन रास (Pisces Horoscope)


मीन राशीच्या लोकांसाठी शुक्र-शनी ग्रहाची युती फार सकारात्मक परिणाम देणारी असणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसेल. समाजात तुमची लोकप्रियता अधिक वाढेल. करिअरमध्ये प्रगतीचे अनेक मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. यासाठी थोडी सावधानता बाळगणं गरजेचं आहे. आरोग्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही. तसेच, नियमित योग आणि व्यायाम तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. 


हे ही वाचा : 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


Trigrahi Yog 2025 : तब्बल 50 वर्षांनंतर बनतोय पॉवरफुल त्रिग्रही योग; 18 ऑगस्टपासून 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु, हातात खेळणार पैसाच पैसा