Trigrahi Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक अंतराने राशी परिवर्तन करतात. यामुळे त्रिग्रही (Trigrahi Yog) आणि चतुर्ग्रही योग जुळून येतो. याचा प्रभाव मानवासह देश-विदेशात पाहायला मिळतो. द्रिक पंचांगानुसार, 26 जुलै 2025 रोजी शुक्र ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला. तर, गुरु ग्रह मिथुन राशीत संक्रमण करतायत. त्यामुळे मिथुन राशीत शुक्र आणि गुरु ग्रह एकत्र विराजमान आहेत.
या दरम्यान 18 ऑगस्ट रोजी चंद्राचा मिथुन राशीत प्रवेश होणार आहे. त्यामुळे शुक्र आणि गुरु ग्रहाची युती होणार आहे. या दरम्यान काही राशींना याचा लाभ मिळेल. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी त्रिग्रही योग फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या भाग्य स्थानी हा योग जुळून येणार आहे. त्यामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुम्ही धार्मिक कार्यात मग्न व्हाल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
त्रिग्रही योग मिथुन राशीसाठी फार शुभदायी असणार आहे. या राशीच्या लग्न भावात हा योग जुळून येतोय. त्यामुळे या कालावधीत तुम्हाला चांगली स्थळं येऊ शकतात. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. तसेच, कोर्ट कचेरीच्या संदर्भातील कामे लवकर संपतील. या काळात तुमचं आरोग्य देखील एकदम चांगलं असणार आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग फार लाभदायी ठरणार आहे. कारण या राशीच्या कुंडलीच्या कर्म भावात जुळून येणार आहे. त्यामुळे या काळात तुमची व्यवसायात चांगली प्रगती होईल. तसेच, तुम्ही केलेल्या कामाचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, तुमच्या व्यवसायातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :