Shukra Shani Yuti 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र (Venus) ग्रह हा धनसंपत्तीचा कारक ग्रह मानला जातो. शुक्र ग्रह प्रत्येक 26 दिवसांनी राशी परिवर्तन करतो. याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. हा परिणाम काही राशींच्या लोकांसाठी शुभ असतो तर काही राशींच्या लोकांसाठी अशुभ असतो. आता शुक्र ग्रहाची शनी (Shani Dev) ग्रहाबरोबर युती होणार आहे. या युतीचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. यामध्ये 3 राशींना शनी आणि शुक्र ग्रहाच्या अशुभ परिणामांचा सामना करावा लागणार आहे. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात . 


हिंदू पंचांगानुसार, कर्मफळदाता शनी आधीपासूनच कुंभ राशीत विराजमान आहे. तर, शुक्र ग्रह 28 डिसेंबर 2024 रोजी रात्री 11 वाजून 28 मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे शुक्र आणि शनीची युती होणार आहे. यामुळे नवीन वर्षाची सुरुवात काही राशींसाठी शुभकारक असणार आहे. तर, 3 राशींसाठी नवीन वर्ष धोक्याचे असणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात . 


कन्या रास (Virgo Horoscope)


शुक्र आणि शनीची युती कन्या राशीच्या सहाव्या चरणात जुळून येतेय. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांना शत्रुत्व आणि आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे. या काळात कोणाशीच वाद घालू नका. किंवा कोणालच प्रतिउत्तर देऊ नका. या काळात तुमचे तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर मतभेद देखील होऊ शकतात. तसेच, या काळात तुम्ही तुमच्या आरोग्यावर आणि लाईफस्टाईलवर लक्ष देण्याची गरज आहे. 


धनु रास (Sagittarius Horoscope) 


धनु राशीच्या लोकांसाठी शनी-शुक्रची युती अशुभ ठरणार आहे. या राशीच्या तिसऱ्या चरणात ही युती होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना पुढचे 26 दिवस सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला एखाद्या आजाराचा सामना करावा लागू शकतो. तसेत, तुमच्या व्यवसायात देखील तुमचं नुकसान होऊ शकतं. अशा वेळी धैर्य सोडू नका. संयमाने काम करा. 


मीन रास (Pisces Horoscope)


मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक ठरु शकतो. या काळात तुमच्या संकटांत वाढ होऊ शकते. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कामात देखील तुम्हाला अनेक अडथळे येऊ शकतात. अशा वेळी तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागेल. तसेच, वाहन चालवताना काळजी घ्या. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नका. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Astrology : आज चंद्राधि योगासह जुळून आले अनेक शुभ योग; मिथुनसह 'या' 5 राशींना अचानक होणार धनलाभ