Shukra Nakshatra Parivartan 2025 : ज्योतिष शास्त्रात, शुक्र ग्रह (Venus) जेव्हा नक्षत्र बदलतात तेवहा त्याचा परिणाम व्यक्तीच्या नातेसंबंधांवर, धन, करिअर आणि विचारांवर खोलवर परिणाम होतो. येत्या 7 नोव्हेंबर रोजी म्हणजेच उद्या शुक्राचा (Shukra Gochar) स्वाती नक्षत्रात प्रवेश होणार आहे. शुक्र ग्रहाला ज्योतिष शास्त्रात सौंदर्य, प्रेम, कला, वैभव आणि नात्यांचा कारक ग्रह मानला जातो. जेव्हा शुक्र ग्रह या राशीच्या नक्षत्रात येतो तेव्हा जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतात.
द्रिक पंचांगानुसार, 7 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजून 13 मिनिटांनी शुक्र ग्रह न७त्र परिवर्तन करणार आहे. शुक्र ग्रह 18 नोव्हेंबरपर्यंत याच नक्षत्रात स्थित असणार आहे. शुक्र ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने अनेक राशींच्या शुभ फळ मिळणार आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी शुक्र ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन भाग्यशाली ठरणार आहे. या काळात तुमच्या धनसंपत्तीत भरभराट झालेली दिसेल. तसेच, जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. नवीन प्रोजेक्टवर तुम्ही काम करायला घेऊ शकता. उत्पन्नाचे नवीन सोर्स तुमच्यासमोर खुले होतील. तुमच्या प्रेम जीवनात गोडवा टिकून राहील. फक्त या काळात तुमचा अहंकार बाजूला ठेवा.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी शुक्राच्या संक्रमणाचा काळ सकारात्मक ठरणार आहे. या दरम्यान तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. नवीन नातेसंबंध निर्माण होतील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. जे लोक अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. मित्रांच्या सहकार्याने तुमची सगळी कामे सुरळीत पार पडतील.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचं संक्रमण लाभदायी ठरणार आहे. या काळात समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येऊ शकतात. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे तुम्ही या काळात पूर्ण करु शकता. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)