Shukra Nakshatra Gochar 2024 : शुक्र ग्रहाचं (Shukra) आद्रा नक्षत्रात प्रवेश होणार आहे. शुक्र ग्रह हा सुख-समृद्धी, प्रेम, सुंदरता, सुखी वैवाहिक जीवनाचा कारक आहे. 12 जून रोजी शुक्राने संक्रमण करूम मिथुन राशीत प्रवेश केला. आता 18 जून रोजी शुक्र नक्षत्र पुन्हा परिवर्तन करणार आहे. शुक्राचे नक्षत्र परिवर्तन आद्रा नक्षत्रात होणाप आहे. याचा 4 राशींना चांगला लाभ होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


शुक्र ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक असणार आहे. या लोकांना बिझनेसमध्ये चांगला लाभ होईल. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. तसेच, पैसे गुंतवण्याचे अनेक मार्ग खुले होतील. तुमच्या वैवाहिक जीवनातील तणाव संपुष्टात येईल. 


सिंह रास (Leo Horoscope)


शुक्र ग्रहाचं नक्षत्र संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी फार भाग्याचं ठरणार आहे. आत्तापर्यंत आलेल्या सगळ्या संकटांपासून तुमची सुटका होईल. तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती होईल. नोकरीच्या अनेक संधी निर्माण होतील. 


तूळ रास (Libra Horoscope)


शुक्राचं आद्रा नक्षत्रात प्रवेश तूळ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. उत्पन्नाचे अनेक नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमच्या बॅंक बॅलेन्समध्ये वाढ होईल. तसेच, तुम्हाला अचानक धनलाभही होण्याची शक्यता आहे. 


मकर रास (Capricorn Horoscope)


शुक्र ग्रहाचं आद्रा नक्षत्रात होणारं संक्रमण मकर राशीच्या लोकांसाठी भाग्याचं ठरणार आहे. या काळात तुमच्या धन-संपत्तीत लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या नात्यामधला दुरावा कमी होईल. जोडीदाराचा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाठिंबा मिळेल. तुमची प्रगती होईल. 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा :


Shani Dev : 30 जूनपासन सुरु होणार शनीची वक्री चाल; मेष ते मीन कोणत्या राशींवर कसा परिणाम होणार? जाणून घ्या