Shukra Godhar 2023 : 2023 हे नव वर्ष अवघ्या एक दिवसावर आले आहे. उद्याच्या शनिवारनंतर नवीन वर्षे सुरू होत आहे. सर्वांनाच नव्या वर्षाच्या स्वागताची आस लागली आहे. हे नवे वर्षे काही राशीच्या लोकांना खूपच भाग्यकारक जाणार आहे. या वर्षात काही राशीचे लोक मालामाल होणार आहेत. मीन राशीत शुक्राच्या प्रवेशाने मालव्य राजयोग तयार होईल. त्याच्या शुभ प्रभावामुळे या राशींचा भाग्योदय तयार होत आहे. त्यामुळे या लोकांना अमाप संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.
पंचांगानुसार बुधवारी 15 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 8.12 वाजता शुक्राचे संक्रमण होईल. यावेळी ते मीन राशीत प्रवेश करतील. ज्यामुळे मालव्य राजयोग तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार मालव्य योग हा पंचमहापुरुष योगांपैकी एक आहे. जो अत्यंत शुभ योग मानला जातो. मीन राशीत तयार झालेल्या मालव्य राज योगाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. त्यांना या वर्षी अचानक आर्थिक लाभ आणि प्रगतीचे योग आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शुक्र स्वतःच्या राशीत म्हणजे वृषभ आणि तूळ राशीत किंवा मीन राशीच्या पहिल्या, चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या भागात असतो तेव्हा मालव्य राजयोग तयार होतो. शुक्राच्या कृपेने मालव्य योग असलेल्या व्यक्तीचे भाग्य चांगले असते.
वृषभ : करिअर आणि व्यवसायासाठी हा काळ चांगला राहील. नवीन नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. नोकरीत प्रमोशन मिळू शकते.
सिंह: वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. राजकारणाशी संबंधित लोकांना मोठी जबाबदारी मिळू शकते. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.
धनु : कुंभ राशीतील शनी संक्रमण तुम्हाला साडेसातीपासून मुक्ती देईल. तुमचे थांबलेले काम आता सुरू होईल. प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. विवाहाचे प्रस्ताव येतील. तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढेल.
कुंभ : भगवान शनी कुंभ राशीचा अधिपती ग्रह आहे. ते तुमच्या राशीतून लग्न गृहात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील.
महत्वाच्या बातम्या
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्वाच्या बातम्या
Baba Vanga : बाबा वेंगाची 2023 साठी भविष्यवाणी, वाचून अनेकांची झोप उडेल