Shukra Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करुन दुसऱ्या राशीत परिवर्तन करतात तेव्हा त्याचा सर्व 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रह हा प्रेम, सुख, वैभव आणि धन-संपत्तीचा कारक ग्रह आहे. शुक्र ग्रह 2 मार्च रोजी मीन राशीत वक्री झाले होते. आता 13 एप्रिल रोजी पुन्हा मार्गी होणार आहेत. त्यानंतर, 31 मे रोजी शुक्राचा मेष राशीत प्रवेश होणार आहे. या परिवर्तनाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, 3 राशींसाठी (Zodiac Signs) हा काळ फार शुभ असणार आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शुक्राचं संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी फार फलदायी ठरणार आहे. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली असेल. या काळात तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, प्रॉपर्टीच्या संदर्भात तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय देखील घेऊ शकता.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे. व्यापारी वर्गातील लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. तसेच, या काळात तुमचे रखडलेले पैसे देखील तुम्हाला मिळू शकतात. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा फार चांगली असेल. मित्रांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
शुक्र राशीचं संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी फार खास असणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद राहील. तसेच, नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)