Shukra Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार धन आणि ऐश्वर्य देणारा शुक्र या महिन्यात जुलैमध्ये दोनदा राशी बदलणार आहे. ज्यामध्ये 7 जुलै रोजी शुक्र प्रथम कर्क राशीत प्रवेश करेल. तर 31 जुलै रोजी सूर्य देव स्वतःच्या राशीत, म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करेल. ज्योतिष शास्त्रानुसार, मार्चमध्ये शुक्राचे दोन वेळा होणारं संक्रमण खूप महत्त्वाचं मानलं जातं. या काळात काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तसेच करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. या भाग्यशाली राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Continues below advertisement


वृषभ रास (Taurus)


शुक्राचा दोनदा होणारा राशी बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. वाहन खरेदी आणि मालमत्ता खरेदीचं तुमचं स्वप्न पूर्ण होईल. भरपूर पैसे कमावण्यासोबतच तुम्ही पैशाची बचत करण्यातही यशस्वी व्हाल. तुम्हाला या काळात तुमच्या भावा-बहिणींचं सहकार्य लाभेल.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण अनुकूल ठरू शकतं. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीच्या उत्पन्नाच्या घरात, म्हणजेच बाराव्या घरात गोचर करणार आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच, या काळात तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल आणि अडकलेले पैसेही परत मिळतील. यावेळी नोकरदार लोक फक्त त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करतील आणि त्यांचं करियर पुढे नेतील. तसेच, या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. तसेच, यावेळी तुमची गुंतवणूक फायदेशीर ठरेल.


मेष रास (Aries)


शुक्राचं संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. यावेळी तुम्हाला वाहन आणि मालमत्ता खरेदीचं सुख मिळेल. या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळेल. तसेच या काळात तुमची बुद्धिमत्ता आणि कौशल्य गुण वाढतील. या काळात तुम्हाला अतिरिक्त पैसे कमावण्याची संधी मिळेल. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. या काळात तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल.


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा :


Numerology : अत्यंत बालिश असतात 'या' जन्मतारखेच्या मुली; कितीही मोठ्या झाल्या तरी यांचा अल्लडपणा जात नाही, प्रत्येक गोष्ट सांगावी लागते समजावून