Shukra Gochar 2024 : शुक्र ग्रहाला सर्व राशीत शुभ ग्रह मानले जाते. शुक्र ग्रहाच्या राशी (Horoscope) परिवर्तनाने प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही बदल होत असतात. शुक्र ग्रह आज (24 एप्रिल) रात्री 11 वाजून 44 मिनिटांनी मेष राशीत संक्रमण (Shukra Gochar) करणार आहे.
ज्योतिष शास्त्रात मेष रास ही कोणत्याही ग्रहाने संक्रमण करण्याची पहिली रास आहे. मेष राशीत शुक्र ग्रहाचं संक्रमण होणं हे फार महत्त्वाचं स्थान मानलं जातं. शुक्र ग्रहाच्या या संक्रमणात काही राशी प्रेमसंबंधांच्या बाबतीत फार खुश असतील. या राशी कोणत्या त्याबद्दल जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
शुक्र ग्रहाचं संक्रमण मेष राशीत होणार आहे. त्यामुळे या राशीसाठी शुक्र ग्रहाचं संक्रमण फार फलदायी असणार आहे. हे संक्रमण तुमच्या लग्नासंबंधीत काही शुभ संकेत देतील. याच्या शुभ परिणामामुळे तुम्हाला प्रेमसंबंधांत यश मिळणार आहे.
ज्या लोकांची विवाहाशी संबंधित घरात चर्चा सुरु आहे तर त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल. तुमचे प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. जर तुम्हाला प्रेम विवाह करायचा असेल तर त्यासाठी हा चांगला काळ आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
शुक्र ग्रहाचं हे संक्रमण तुमच्या अकराव्या भावात होणार आहे. जे लोक रचनात्मक क्षेत्रात काम करतायत किंवा कामाच्या निमित्ताने प्रवासाल जाणाप आहेत त्यांना चांगलं यश मिळेल. तुमची सगळी कामे वेळेत पूर्ण होतील. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे संबंध अधिक दृढ होतील.
जे लोक आपल्या नात्याला पुढं नेण्याचा विचार करतायत, नात्याची एक वेगळी सुरुवात करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला राहणार आहे. विवाहीत लोकांना सासरच्या मंडळींकडून भरपूर सहकार्य मिळेल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीसाठी शुक्र ग्रहाचं संक्रमण प्रेम, शिक्षण, रचनात्मकता आणि अपत्याच्या पंचम भावात करणार आहे. शुक्र ग्रहाचं हे संक्रमण धनु राशीसाठी भविष्यात चांगल्या संधी घेऊन येणार आहे.
तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला भरपूर यश मिळेल. तुमचे नातेसंबंध दृढ होतील. जर तुम्हाला तुमच्या प्रियकराबरोबर प्रेम विवाह करायचा असेल तर हा काळ फार सुंदर आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :