Shani Dev : ज्योतिषशास्त्रात शनिला कर्मदेवता (Lord Shani) म्हटलं आहे. शनि प्रत्येकाला (Shani Dev) आपल्या कर्मानुसार त्याचे फळ देतो. जेव्हा शनि एखाद्या राशीत वक्री चाल करतो तेव्हा त्या राशीत फार उतार-चढाव निर्माण होतात. शनि सध्या आपली मूळ रास कुंभ राशीत आहे. 29 जून रोजी शनि कुंभ राशीत वक्री चाल करणार आहे. शनिची उलटी चाल 29 जून 2024 रोजी रात्री 12 वाजून 35 मिनिटांनी होणार आहे. शनि कुंभ राशीत 15 नोव्हेंबर 2024 मध्येही कुंभ राशीत उलटी चाल करणार आहे. शनिच्या या वक्री होण्याचा प्रभाव काही राशींसाठी म्हणजेच कर्क, मकर आणि कन्या राशींसाठी शुभ नसणार आहे. तर, सिंह आणि मीन राशींसाठी शनिची वक्री चाल आध्यात्मिकदृष्ट्या चांगली असणार आहे. 29 जून रोजी शनिच्या वक्री चालीमुळे कोणत्या राशींवर प्रभाव पडणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष राशीच्या लोकांना करावे लागतील अपार कष्ट
मेष राशीच्या लोकांना या काळात आपल्या करिअर आणि महत्त्वाकांक्षेचे पुनर्मूल्यांकन करावे लागेल. कठोर परिश्रम करावे लागतील. आणि संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. अपार मेहनत केली तर यश निश्चित मिळेल. शनीच्या प्रतिगामी काळात तुम्हाला थोडे कष्ट करावे लागतील, परंतु परिणाम चांगले मिळतील.
वृषभ राशीच्या लोकांनी विचारपूर्वक पावले उचलावीत
आर्थिक बाबींवर आणि सुरक्षिततेच्या बाबतीत थोडं लक्ष केंद्रित करावं लागेल. अनावश्यक खर्च टाळा. भविष्यासाठी पैशांची बचत करा. याशिवाय छोटी आव्हानं आली तर त्याला न घाबरता हिंमतीने सामना करा. वेळेनुसार निर्णय घ्या.
मिथुन राशीच्या लोकांना कौटुंबिक बाबी सांभाळाव्या लागतील
संवाद आणि नातेसंबंधात काही अडथळे येऊ शकतात. यासाठी तुम्हाला संयमाने काम करावे लागेल. जर तुम्ही कौटुंबिक प्रकरणात कोणत्याही वादात अडकलात तर तुम्हालाच त्रास होईल. परस्पर समन्वयाने निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि संयमाने निर्णय करा.
कर्क राशीच्या लोकांनी भावनांकडे लक्ष द्यावं
कौटुंबिक आणि भावनिक समस्यांकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. तुम्ही भावनेत वाहून जाऊ नये यासाठी तुम्हाला तुमची जास्त काळजी घ्यायची आहे. जुन्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी उत्तम काळ आहे.
सिंह राशीच्या लोकांनी भगवान हनुमानाची पूजा करावी
शनि प्रतिगामी झाल्यामुळे आत्मविश्वास आणि सर्जनशीलता कमी होऊ शकते. याचा सामना करण्यासाठी तुम्हाला भगवान हनुमानाची पूजा करावी लागेल. तसेच, या काळात धीर सोडू नका. सकारात्मक राहा आणि कठोर परिश्रम करत राहा.
कन्या राशीच्या लोकांनी वाईट सवयी सोडून द्या
आरोग्य आणि दैनंदिन दिनचर्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या काळात, अगदी लहान गोष्टी देखील तुमच्यावर भारी पडू शकतात. विशेषत: तुमच्या वाईट सवयी तुमचे आरोग्य बिघडू शकतात, ज्यामुळे तुमच्या कामावरही परिणाम होऊ शकतो. वाईट सवयी सोडून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याची ही चांगली वेळ आहे.
तूळ राशीच्या लोकांना तडजोड करावी लागेल
तूळ राशीच्या लोकांसाठी ही वेळ परस्पर संबंधांकडे लक्ष देण्याची आहे. तुमच्या नात्यात दुरावा निर्माण करणारा कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. यावेळी, नातेसंबंधांमध्ये काही तणाव किंवा असंतुलन असू शकते, म्हणून संयम ठेवा.
वृश्चिक राशीच्या लोकांना भूतकाळाचा सामना करावा लागेल.
भूतकाळातील समस्या सोडविण्यासाठी हा काळ चांगला आहे. भीती सोडून द्या आणि सकारात्मक बदलांसाठी तयार राहा. भूतकाळात जास्त राहू नका त्याचा तुम्हालाच त्रास होईल.
धनु राशीच्या लोकांनी आशा सोडू नये.
या दरम्यान प्रवास करताना सावधानता बाळगा. कारण अनेक अडथळे येऊ शकतात. पण, हार न मानता तुम्ही तुमचे प्रयत्न सुरु ठेवा. आशावादी राहा.
मकर राशीच्या लोकांनी शिस्त पाळावी.
मकर राशीच्या लोकांना करिअर आणि व्यावसायिक जीवनात कठोर परिश्रम आणि संयम बाळगावा लागेल. करिअरच्या बाबतीत, कधीकधी तुम्हाला असे वाटू शकते की वेळ तुमच्या हातातून निसटत आहे किंवा तुम्हाला हवे तसे यश मिळत नाही, पण धीर धरा. ध्येय साध्य करण्यासाठी शिस्त आणि दृढनिश्चय ठेवा.
कुंभ राशीचे लोक त्यांच्या मित्रांना ओळखतील.
सामाजिक जीवनात काही चढ-उतार येऊ शकतात. या दरम्यान तुम्हाला तुमच्या खऱ्या मित्रांची जाणीव होईल. जास्त चिडचिड करू नका. तुमची तत्त्व जरा बाजूला ठेवा.
मीन राशीच्या लोकांनी आत्मपरीक्षण करावं
मीन राशीच्या लोकांना अंतर्मुख होण्याची आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. अध्यात्माकडे लक्ष केंद्रित करा. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :