Shukra Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर आपली राशी (Zodiac Signs) आणि चाल बदलतात. ग्रहांच्या या चालीचा परिणाम सर्व 12 राशीच्या लोकांवर होतो. काहींसाठी हा शुभ प्रभाव असतो तर काहींसाठी हा अशुभ प्रभाव असतो. शुक्र (Venus) हा ग्रह धन, ऐश्वर्य आणि संपत्तीचा कारक आहे. आज शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहे.
वृषभ राशीत शुक्राचं संक्रमण
ज्योतिष शास्त्रानुसार, आज सकाळी 8 वाजून 51 मिनिटांनी शुक्र वृषभ राशीत परिवर्तन झालं आहे. 12 जूनपर्यंत शुक्र याच राशीत विराजमान असणार आहेत. त्यामुळे सर्व 12 राशींपैकी फक्त 3 राशींवर शुक्राचं हे राशी परिवर्तन शुभ ठरणार आहे. या राशींच्या आर्थिक स्थितीत चांगलीच सुधारणा होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
1. वृषभ राशीतील शुक्राचे संक्रमण (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी हे राशी परिवर्तन अतिशय शुभ मानले जाते. यामुळे या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा राहील, त्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. खर्चात कपात होईल. याशिवाय तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर त्यापासून आराम मिळू शकतो. व्यापाऱ्यांसाठी वेळ अनुकूल राहील, एखादा करार निश्चित होऊ शकतो ज्यामुळे मोठा नफा मिळेल. नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते आणि त्यांच्या पगारातही वाढ होऊ शकते.
2. कर्क रास (Cancer Horoscope)
वृषभ राशीतील शुक्राचं संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यवसायात विस्तार होऊ शकतो. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो. कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील. तुम्हाला तुमच्या पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. याशिवाय तुम्ही कुटुंबासोबत कुठेतरी फिरू शकता. जे अविवाहित आहेत त्यांना जोडीदार मिळू शकतो. पती-पत्नीमधील मतभेद दूर होतील.
3. मकर रास (Capricorn Horoscope)
शुक्राचं राशी परिवर्तन मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या दरम्यान तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मानसिक तणाव दूर होईल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्हाला त्यापासून सुटका मिळेल. विवाहितांना त्यांच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: