Beed : श्री समर्थ पादुका प्रचार दौरा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही अनेकांच्या परिचयाचा आहे. बीड शहरात 24 ते 31 जानेवारी दरम्यान श्री समर्थ पादुका प्रचार दौरा सुरू असणार आहे. सर्वेश्वर गणेशापासून पाटांगणापर्यंत पादुकांची भव्य मिरवणूक निघेल. श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगड येथील पादुका प्रचार दौरा आणि भिक्षा फेरी, जन्मस्थान जांब समर्थ येथून अंबानगरी मार्गे सज्जनगडकडे जाताना बीड शहरात भिक्षा फेरीला शुक्रवारी 24 जानेवारीपासून  सुरुवात होणार आहे. ही भिक्षा फेरी आणि प्रचार दौरा 31 जानेवारी दुपारी 12 पर्यंत चालणार आहे.


बीडमधून मिरवणूक कुठून निघणार?


शुक्रवारी, 24 जानेवारी रोजी सहयोग नगरमधील सर्वेश्वर गणेश मंदिरापासून सुभाष रोड मार्गे थोरले पाटांगणापर्यंत पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे, यावेळी ह. भ. प. महादेव महाराज चाकरवाडीकर, श्री भूषण स्वामी अध्यक्ष सज्जनगड संस्थान, समर्थांच्या घराण्यातील अकरावे वंशज, मान्यवर, लोकप्रतिनिधी, नागरिक बंधू-भगिनीचीं विविध ठिकाणी स्वागताला उपस्थिती असणार आहे.


कसा असणार दिनक्रम?


25 ते 31 जानेवारीला सकाळी 8 ते दुपारी 12 यावेळी शहराच्या विविध भागात भिक्षा फेरीचा कार्यक्रम होईल. पाटांगणावर मुक्कामी असलेल्या पादुका ठिकाणी दररोज सकाळी काकड आरती, अभिषेक आरती, आठ ते बारा पर्यंत भिक्षा फेरी, सायंकाळी सांप्रदायिक नित्य उपासना, किर्तन सेवा, शेजारती होईल. सर्व भाविक भक्तांनी, समर्थ सेवेकर,  नागरिक बंधू-भगिनींनी सहभागी होण्याचे आवाहन संपादक दिलीपराव खिस्ती विनायक महाराज पाटांगणकर ,प्रा. डॉ. दीपक देशमुख, समर्थ भक्त कृष्णा महाराज रामदासी यांनी केलं आहे.


भिक्षा फेरीचे वेळापत्रक


शनिवार 25 जानेवारी : धोंडीपुरा, पाटांगण गल्ली, बोबडेश्वर गल्ली,सराफा रोड, टिळक रोड, सुभाष रोड.
रविवार 26 जानेवारी : पेठ बीड, हिरालाल चौक, बुरुड गल्ली, काळा हनुमान ठाणा.
सोमवार 27 जानेवारी : सावरकर महाविद्यालय परिसर, नेत्रधाम, दुधाळ कॉलनी, सहयोग नगर. 
मंगळवार 28 जानेवारी : कृषी नगर, नामदेव नगर, पिंगळे नगर, नाट्यगृह परिसर ,विद्यानगर पश्चिम
बुधवार 29 जानेवारी : क्रांतीनगर, जवाहर कॉलनी, भक्ती कन्स्ट्रक्शन, श्रीराम नगर.
गुरुवार 30 जानेवारी : गायत्री नगर, चक्रधर नगर, शिंदे, नगर सुमती नगर.


कसा सुरू झाला पादुका प्रचार दौरा?


श्री समर्थ पादुका प्रचार दौऱ्याची उदात्त कल्पना इ. स. 1950 साली श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड या संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष स. भ. बाबुराव वैद्य यांना सुचली. भाविकांना त्या काळात सज्जनगडावर येणे, वास्तव्य करणे कठीण होते. त्यामुळे आपणच भाविकांजवळ जाऊन त्यांना समर्थ पादुकांच्या दर्शनाचा लाभ घडवावा आणि कीर्तन, प्रवचन, भिक्षा फेरी इत्यादी माध्यमातून लोकांना समर्थांची, त्यांच्या तत्त्वज्ञानाची ओळख व्हावी ह्या लोककल्याणकारी हेतूने पहिला श्रीसमर्थ पादुका प्रचार दौरा इ. स. 1950 साली बदरीनाथ येथे नेण्यात आला. 


हेही वाचा:


Shani Gochar 2025 : अवघ्या 67 दिवसांत शनीची मीन राशीत उडी; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, कडक साडेसाती होणार सुरू