Shani Sadesati 2025 : शनि हा ग्रह अत्यंत प्रभावशाली मानला जातो आणि तो न्यायाचे प्रतीक मानला जातो. शनि (Shani 2025) हा सर्वात संथ गतीचा ग्रह आहे, त्यामुळे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला अडीच वर्षं लागतात. शनीचे नाव घेताच अनेक लोक घाबरतात आणि त्याच्या प्रभावामुळे चिंतेत राहतात, परंतु माणसाने आपले कर्म शुद्ध ठेवणे आवश्यक आहे.


जेव्हा एखाद्या व्यक्तीला शनीची साडेसाती किंवा महादशेचा त्रास होतो तेव्हा त्याने आपल्या कर्माकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. शनीची साडेसाती किंवा महादशा सहसा शुभ मानली जात नाही. सध्या शनि कुंभ राशीत आहे आणि 29 मार्च 2025 पर्यंत तो या राशीत राहील, त्यानंतर तो मीन राशीत प्रवेश करेल. शनीने मीन राशीत प्रवेश करताच काही राशींची साडेसाती सुरू होईल, तर काही राशी साडेसातीतून मुक्त होतील.


शनीची साडेसाती कशी असते?


ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह एका घरातून दुसऱ्या घरात प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रमण म्हणतात. कुंडलीच्या बाराव्या भावात शनि गोचर करतो तेव्हा शनीच्या साडेसातीचा प्रभाव सुरू होतो. शनीची साडेसाती तीन टप्प्यात विभागली आहे : पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. पहिल्या टप्प्याचा कालावधी 2 वर्षे 6 महिन्यांचा आहे. पहिल्या टप्प्यात व्यक्तीला मानसिक समस्यांना तोंड द्यावं लागतं. दुसऱ्या टप्प्यात व्यक्तीला आर्थिक नुकसान, आर्थिक संकट, आरोग्याशी संबंधित समस्या आणि मित्रांकडून विश्वासघात होऊ शकतो. तिसऱ्या टप्प्यात व्यक्तीचे होणारे नुकसान दूर होते आणि या अवस्थेत व्यक्तीला लाभ मिळतो.


मीन राशीचे लोक अडचणीत


सध्या मीन राशीत शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे, त्यामुळे मीन राशीच्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 29 मार्च 2025 पासून शनि साडेसातीचं दुसरं चरण सुरू करेल, ज्यामुळे अडचणी आणखी वाढतील.


यावेळी तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुम्हाला पायाला दुखापत आणि आरोग्याशी संबंधित अन्य समस्यांचा धोका असू शकतो. जेव्हा शनीच्या साडेसातीचा प्रभाव वाढतो तेव्हा ज्या लोकांना तुम्ही कर्ज दिलं आहे, त्यांच्याकडून पैसे परत मिळण्यास विलंब होऊ शकतो. कौटुंबिक खर्च वाढतील आणि या काळात वाहन चालवताना काळजी घ्यावी. साडेसातीच्या काळात व्यवसायात व्यत्ययही येऊ शकतात. औषधांवर जास्त खर्च होईल आणि मानसिक तणाव कायम राहील. मीन राशीच्या लोकांना मित्र आणि नातेवाईकांकडून सहकार्य मिळणार नाही.


2025 मध्ये कोणत्या राशींवर साडेसाती? (Shani Sadesati 2025)


शनि मीन राशीत प्रवेश करताच मकर राशीच्या लोकांसाठी साडेसाती समाप्त होईल. दुसरीकडे, शनीच्या संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांची साडेसाती सुरू होईल. मेष राशीवर साडेसतीचा पहिला टप्पा असेल, मीन राशीवर साडेसातीचा दुसरा टप्पा असेल आणि तिसरा आणि शेवटचा टप्पा कुंभ राशीवर असेल. 


शनि साडेसाती उपाय (Shani Sadesati Upay)


मीन राशीच्या लोकांनी शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी स्वतःला मजबूत ठेवावं. तामसिक आहार टाळा आणि तुमच्याकडे काम करणारा नोकर असेल तर त्याच्याशी मैत्रीपूर्ण वागणूक ठेवा. गरजूंना मदत करा. शनिवारी गरजूंना बूट किंवा चप्पल क्रमांक 7 दान करा. एका वाडग्यात मोहरीचे तेल टाका, त्यात एक नाणं टाका आणि त्यात आपला चेहरा पहा, सोबत शनि मंत्राचा जप करा. शनिवारी माकडाला हरभरे खाऊ घाला आणि सुंदरकांड आणि हनुमान चालिसा पठण करा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Budh Shani Yuti : तब्बल 30 वर्षांनंतर शनि आणि बुधाची युती; 3 राशीचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन