Shravan 2025: श्रावण महिना म्हणजेच भगवान शंकराचा अत्यंत प्रिय महिना. या काळात विवाहासाठी योग्य जोडीदार मिळावा, शिव-पार्वतीसारखी सहजीवनात समृद्धी यावी यासाठी डॉ भूषण ज्योतिर्विद यांनी काही अतिशय प्रभावी उपाय आणि पूजाविधी सांगितले आहेत. जाणून घ्या, हे उपाय आणि पूजा विधी भक्तीने केल्यास तुम्हाला मनासारखा जोडीदार आणि विवाह लवकर होण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण भगवान शंकर आणि पार्वती तसा आशीर्वाद देतात.
शिव-पार्वतीसारख्या विवाहासाठी श्रावणातील खास उपाय:
सोमवारी श्रावण व्रत (श्रावण सोमवारी उपवास)प्रत्येक सोमवारी उपवास करा.शिवलिंगावर कच्चं दूध, जल, मध, बेलपत्र, दही, गूळ अर्पण करा.मंत्र: “ॐ नमः शिवाय” किंवा “ॐ पार्वतीपतये नमः” या मंत्राचा 108 वेळा जप करा.
उमामहेश्वर पूजन
एकत्र शिव-पार्वतीची मूर्ती/चित्र समोर ठेवा.
ही प्रार्थना करा:
“हे शिवशंकर आणि पार्वती माते, तुमच्यासारखा जोडीदार लाभो, आयुष्यभर प्रेम मिळो.”लाल फुलं, गुलाब, सिंदूर, चंदन, मिठाई अर्पण करा.
रुद्राभिषेक
रुद्राभिषेक करून योग्य पद्धतीने रुद्रसूक्त, महामृत्युंजय मंत्र, किंवा शिव तांडव स्तोत्र पठण करावे.विशेषत: “ॐ त्र्यंबकं यजामहे…” हा महामृत्युंजय मंत्र 108 वेळा जप अत्यंत फलदायी मानला जातो.
बेलपत्रावर इच्छा लिहून अर्पण करा
बेलपत्रावर आपल्या इच्छित जीवनसाथीचे नाव किंवा ‘सुखी विवाहासाठी’ अशी भावना ठेवून अर्पण करा.11 किंवा 21 बेलपत्र अर्पण करा.
नंदीदेवाला कानात इच्छा सांगणे
मंदिरातील नंदीच्या कानात हळू आवाजात आपली इच्छा मांडा.असे मानले जाते की नंदी ती इच्छा थेट शंकराला पोहचवतात.
श्रावण सोमवार कुमारी पूजन (विशेष मुलींनी)
जर स्त्री अविवाहित असेल तर श्रावणात 9 कुमारी मुलींचे पूजन करून त्यांना खीर, फळे, वस्त्र व दक्षिणा द्यावी.
शुभ फळ देणारे काही विशेष मंत्र:
शिव विवाह मंत्र
“कात्यायनि महामाये महायोगिन्यधीश्वरि।नंदगोपसुतं देवि पतिं मे कुरु ते नमः॥”
शिव पार्वती स्तुती
ॐ गौरीप्रियायै च नमः।ॐ उमापतये नमः।ॐ हरहर महादेवाय नमः।”
अंतिम विशेष उपाय (विशेष दिवशी)
श्रावणातील प्रदोष व्रत (दोनदा येतो) – या दिवशी शिव पूजन केल्यास विवाहात अडथळे दूर होतात.श्रावण पौर्णिमा / नागपंचमी / शिवरात्र – या दिवशी उपासना विशेष फळ देते.
(टीप: हे सर्व उपाय श्रद्धेने, सात्त्विकतेने व नियमिततेने केल्यास योग्य फळ मिळते. तुम्हाला शिव-पार्वतीसारखा प्रेमळ, दीर्घायुषी आणि सौख्यदायक संसार लाभो ही शुभेच्छा)
हेही वाचा :
Shani Dev: म्हणूनच शनिदेव तुमच्यावर रागावतात! 'ही' 5 कामं आजच सोडा, सुखी आयुष्य जगाल..