Shardiya Navratri 2025 : हिंदू शास्त्रानुसार, शारदीय नवरात्रोत्सव (Shardiya Navratri 2025) सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. नवरात्रीच्या या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. मात्र, यंदाची नवरात्र खास असणार आहे. कारण या दिवशी फार शुभ योग (Yog) जुळून आला आहेत. यंदाच्या नवरात्रीत महालक्ष्मी राजयोग नावाचा शुभ योग जुळून येणार आहे. त्यामुळे काही राशींना याचा चांगलाच लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुमचं नशीबही बदलू शकतं. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
महालक्ष्मी राजयोग 2025 (Mahalakshmi Rajyog 2025)
वैदिक पंचांगानुसार, यंदा 22 सप्टेंबर 2025 रोजी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. तर, 2 ऑक्टोबरपर्यंत हा काळ सुरु राहील. या दरम्यान, 24 सप्टेंबर रोजी चंद्राची चाल बदलून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी मंगळ ग्रह आधीपासूनच स्थित आहे. त्यामुळे जेव्हा धन आणि सुख समृद्धीचा कारक चंद्र ग्रह, साहस आणि ऊर्जेचं प्रतीक असलेल्या मंगळ ग्रहाला मिळतो तेव्हा महालक्ष्मी राजयोग नावाचा शुभ योग जुळून येतो. ज्योतिष शास्त्रानुसार, हा योग फार शुभ मानला जातो.
महालक्ष्मी राजयोगामुळे 'या' 3 राशींचं पालटणार नशीब
तूळ रास (Libra Horoscope)
महालक्ष्मी राजयोग नावाचा शुभ योग तूळ राशीत निर्माण होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना सर्वाधिक लाभ मिळेल. तसेच, या काळात धनसंपत्तीच्या संबंधित तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. करिअरमध्ये प्रमोशनची संधी मिळेल. तसेच, मित्रपरिवाराबरोबर चांगले संबंध निर्माण होतील.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी हा राजयोग कर्म आणि लाभाच्या स्थानी जुळून येणार आहे. या काळात प्रवासाचे देखील योग आहेत. कामाच्या निमित्ताने तुम्हाला फिरावं लागू शकतं. तसेच, नोकरीत तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांचा सपोर्ट मिळेल. तुमच्या कामावर तुमचे वरिष्ठ अधिकाऱी खुश होऊ शकतील. तसेच, या काळात तुम्हाला मित्र मैत्रीणींचा चांगला सपोर्ट पाहायला मिळेल. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल असणार आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या भाग्य आणि धर्माच्या स्थानी हा योग जुळून येणार आहे. या काळात तुमच्यासाठी नशिबाचे दार उघडतील. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे तुम्ही पूर्ण करु शकता. तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला दिसेल. तसेच, नवीन गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. धार्मिक कार्यात तुमची रुची जास्त वाढलेली दिसेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :