Shukra Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक अंतराने राशी परिवर्तन करतात. याचा प्रभाव मानवी जीवनावर देखील पाहायला मिळतो. माहितीसाठी, वैभव, सुख-संपत्तीचा दाता शुक्र ग्रह (Shukra Gochar 2025) दिवाळीनंतर (Diwali)नोव्हेंबर महिन्यात तूळ राशीत प्रवेश करणार आहे. याचा प्रभाव अनेक राशींवर पाहायला मिळेल. पण, काही 3 राशी अशा आहेत ज्यांचा या काळापासून सुवर्णकाळ सुरु होईल. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन सकारात्मक ठरणार आहे. या राशीच्या दहाव्या स्थानी हे संक्रमण होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्ही जे काही कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, तुमच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता दिसून येईल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचं संक्रमण फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या राशीच्या अकराव्या चरणात हे परिवर्तन दिसून येईल. तसेच, तुमच्या संपत्तीत भरभराट पाहायला मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळतील. समाजात तुमची प्रतिष्ठा टिकून राहील. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी शुक्र ग्रहाचं संक्रमण फार भाग्यशाली ठरणार आहे. या राशीच्या लग्न भावात हे संक्रमण होणार आहे. तसेच,या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यामुळे ज्या लोकांचं लग्न अजून ठरत नाहीये. त्यांना या काळात शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तुमचं वैवाहिक जीवनदेखील सुरळीत चालेल. पार्टनरशिपमध्ये तुम्ही तुमच्या कामाची सुरुवात करु शकता. समाजात प्रतिष्ठा टिकून राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :
