Shardiya Navratri 2024 : शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून महा अष्टमीची सर्वात महत्त्वाची तिथी लवकरच येत आहे. नवरात्रीत (Shardiya Navratri 2024) अष्टमी तिथीला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीत अष्टमी तिथीला उपवास केला जातो  तर नवमी तिथीला कन्या पूजन करण्याची परंपरा आहे. त्यानुसार, यंदाच्या नवरात्रीत अष्टमी-नवमीच्या दिवशी तुम्ही काही उपाय करुन या दिवसाचं महत्त्व वाढवू शकता. 


नवरात्रीत अष्टमी-नवमीच्या दिवशी काही शुभ वस्तू घरात आणल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात धन-धान्याची वृद्धी होते. 


हिंदू शास्त्राप्रमाणे, 12 ऑक्टोबर रोजी विजयादशमी आहे. या दिवशी नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. मान्यतेनुसार, नवरात्रीच्या सप्तमीला दुर्गा देवीची पूजा केली जाते. जर, अष्टमी-नवमीला काही खास वस्तू खरेदी करुन घरी आणल्या तर दुर्गा देवी प्रसन्न होते. 


नवरात्रीच्या अष्टमी-नवमीला 'या' वस्तू खरेदी करा 


पितळेचा कलश 


ज्योतिष शास्त्रानुसार, जर नवरात्रीच्या अष्टमी तिथीच्या दिवशी पितळेचा कलश घरी आणला तर सर्व भक्तांवर दुर्गा देवीची कृपा होते. तसेच, धार्मिक कार्यात देखील पितळेच्या कलशाचा वापर करावा. हा अत्यंत शुभ मानला जातो. तसेच, पितळेचा कलश घरात ठेवल्याने गृह दोषापासून मुक्ती मिळते. 


मोरपंख 


नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीच्या दिवशी घरी मोरपंख नक्की आणावा. मोरपंख घरात आणल्याने घराच्या सुख-शांती, समृद्धीत वाढ होते. तसेच, नकारात्मक ऊर्जा दूर होते. 


श्रृंगाराच्या वस्तू 


ज्योतिष शास्त्रानुसार, महिलांनी नवरात्रीच्या अष्टमी तिथीच्या दिवशी श्रृंगाराच्या वस्तू घरी आणाव्यात. हे अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच, यामुळे घरात कधीच धन-धान्याची कमतरता भासत नाही. तसेच, देवीचा सदैव आशीर्वाद राहतो. 


चांदीचं नाणं


ज्योतिष शास्त्रानुसार, नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीच्या दिवशी चांदीचं नाणं घरी आणणं शुभ मानलं जातं. चांदीच्या नाण्यात देवी दुर्गेचा फोटो असेल तर घरात आर्थिक वाढ होते. तसेच, पैशांची कधीच कमतरता भासत नाही असं म्हणतात. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Shardiya Navratri 2024 : नवरात्रीची अष्टमी आणि नवमी तिथी कधी? कन्या पूजनाचं महत्त्व नेमकं काय? वाचा सविस्तर