Saturday Remedies : शनिवार हा न्याय देवता शनिदेवाला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रहांमध्ये शनीला (Shani) विशेष स्थान आहे. शनिदेव प्रत्येक व्यक्तीच्या कर्माची नोंद ठेवतो आणि त्यानुसार प्रत्येकाला फळ देतो. शनिदेवाकडे विलक्षण शक्ती असते. ज्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं. असं म्हणतात की, ज्या व्यक्तीवर शनिदेवाची शुभ दृष्टी पडते त्याला जीवनात कशाचीही कमतरता भासत नाही.
जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे वाईट दिवस सुरू आहेत, प्रत्येक कामात तुम्हाला अपयश मिळतंय किंवा घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी पडतेय, तर तुमच्यावर शनीचा अशुभ प्रभाव असू शकतो. शनीची साडेसाती सुरू असल्यास नोकरी-व्यवसायात यश मिळत नाही आणि सतत पैसा खर्च होत राहतो. अशा स्थितीत शनिवारी काही विशेष उपाय (Shaniwar Upay) केल्यास तुम्हाला शनीची साडेसाती आणि वाईट प्रभावापासून आराम मिळेल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल आणि सर्व अडचणी दूर होतील. हे उपाय नेमके कोणते? जाणून घ्या.
शनिवारी करा हे पाच उपाय
1) जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल किंवा तुम्हाला पैशांची चणचण जाणवत असेल तर अर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आज, म्हणजेच शनिवारच्या दिवशी एक रुपायचं नाणं घ्या आणि त्या नाण्यावर मोहरीच्या तेलाचा एक ठिपका लावून शनि मंदिरात ठेवा. यानंतर आर्थिक लाभ मिळण्यासाठी शनिदेवाकडे प्रार्थना करा.
2) जर तुम्हाला प्रत्येक कामासाठी अतोनात झटावं लागत असेल, खूप मेहनत केल्यावरच यश मिळत असेल, लवकर एखादं काम पूर्ण होत नसेल तर हा उपाय करा. शनिवारच्या दिवशी मूठभर काळे तीळ घेऊन ते वाहत्या पाण्यात सोडा. तसेच शनिदेवाचे ध्यान करत प्रार्थना करा.
3) वडिलोपार्जित जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला भेडसावत असेल तर त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी हा उपाय करा. शनिवारच्या दिवशी एक पिठाचा दिवा बनवा, त्यात मोहरीचे तेल टाका, दिव्याला वात करा आणि शनिदेवासमोर दिवा लावा. तुमच्या मनातील इच्छा शनिसमोर व्यक्त करा.
4) जर तुम्हाला एखाद्या सरकारी कामात अडचणी येत असेल तर या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी शनि स्तोत्राचं पठण करा. दिवसभरात कधीही तुम्ही शनि स्तोत्राचं पठण करू शकता, परंतु हा पाठ करताना तुमचं तोंड पश्चिमेकडे असावं, कारण पश्चिम ही शनीची दिशा आहे.
5) समाजात प्रसिद्धी आणि मान-सन्मान प्राप्त करण्यासाठी शनीचा हा उपाय करा. शनिवारी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि शनिदेवाच्या मंत्राचा 51 वेळा जप करावा.
शनिदेव मंत्र : ओम प्रं प्रेमं स: शनैश्चराय नमः।
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :