Saturday Remedies : शनिदेवाची अशुभ दृष्टी अत्यंत त्रासदायक मानली जाते. शनीची साडेसाती दीर्घकाळ टिकते, ज्या व्यक्तीवर साडेसाती राहते त्यांना सतत संकटांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर शनीची चांगली स्थिती जीवनात बहार आणते. शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे, अशा स्थितीत शनिवारी काही खास उपाय करून तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करू शकता आणि साडेसातीचा प्रभाव कमी करू शकता. शनीला प्रसन्न करण्याचे टॉप 10 उपाय (Shani Remedies) कोणते? जाणून घेऊया.
शनीला कसं प्रसन्न करावं? (Shani Remedies)
1. शनिवारी 7 वेळा शनि स्तोत्राचं पठण करा.
शनि स्तोत्र
ॐ नीलांजन समाभासं रवि पुत्रं यमाग्रजम ।
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम ।।
2. शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही पक्षी, मासे आणि प्राण्यांना धान्य, पाणी किंवा चारा
खाऊ घालू शकता.
3. शनिदेवाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी हनुमानाची पूजा करा. रोज हनुमान चालिसा पठण केल्याने शनिदेवाच्या कोपापासून तुम्ही वाचू शकता.
4. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा.
5. साडेसाती किंवा महादशेच्या वेळी मांस किंवा मद्य सेवन करू नये. शनिवारीही तामसिक पदार्थाचे सेवन टाळावे.
6. कुंडलीतील शनीची स्थिती मजबूत करण्यासाठी वृद्धांचा आदर करा. गरिबांशी चांगलं वागा, त्यांच्याशी गैरवर्तन करू नका आणि कुणाचंही मन दुखवू नका.
7. मोहरीच्या तेलाच्या दिव्यात काळे तीळ मिसळून शनि मंदिरात प्रज्वलित केल्यानेही तुमच्यावर शनीची अपार कृपा होऊ शकते.
8. शनिवारी काळे तीळ, काळे कपडे किंवा काळी उडीद डाळ दान करणं शुभ मानलं जातं, यामुळे शनिही प्रसन्न होतो.
9. भक्तीने शनि मंत्र 'ॐ शं शनिश्चराय नमः' चा जप करा.
10. गरिबांना अन्नदान करून किंवा मदत करूनही शनिदेवाचा राग शांत होऊ शकतो.
शनिवारी शनीची पूजा का करावी?
शनीच्या शुभ प्रभाव असल्यास माणूस यशाकडे वाटचाल करत राहतो. पण हेच जर, शनि दोष किंवा शनीची साडेसाती मागे लागली तर केलेलं कामही बिघडतं. तसेच व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो, त्यामुळे शनि दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी शनिदेवाची पूजा करावी. या काळात काही विशेष उपाय केल्यास व्यक्तीला जीवनात शुभ परिणाम मिळू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :