Shani Vakri 2024 : ज्योतिषशास्त्रात शनीला (Shani) विशेष महत्त्व आहे. शनिदेवाला न्याय देवता म्हटलं जातं, तो व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. जेव्हा जेव्हा शनि एखाद्या राशीत वक्री होतो, तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, सध्या शनि कुंभ राशीत विराजमान असून 29 जूनला याच राशीत शनि वक्री (Shani Vakri) होईल. शनीची ही स्थिती 15 नोव्हेंबरपर्यंत कायम राहील.
शनीच्या वक्री (Shani Vakri 2024) स्थितीमुळे काही राशीच्या लोकांना शुभ, तर काहींना अशुभ परिणाम पाहायला मिळतील. मेष आणि वृषभसह 4 राशींच्या लोकांसाठी शनि वक्री अशुभ ठरेल. या राशींना या काळात अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. आर्थिक समस्यांसोबतच आरोग्याशी संबंधित समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. नोकरी-व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शनि वक्री काळात 4 राशींच्या लोकांना सावध राहावं लागणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
शनि वक्रीचा 'या' 4 राशींना बसणार फटका
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांना शनीच्या वक्री चालीमुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चढ-उतार होऊ शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात सावध राहावं लागेल, वादापासून दूर राहावं लागेल, अन्यथा खटके उडू शकतात. तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर या काळात तुम्हाला अडथळ्यांना सामोरं जावं लागू शकतं. या काळात तुमचं आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता आहे.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांवर शनीच्या वक्री चालीचा परिणाम होईल. कामाच्या ठिकाणी सर्वाधिक प्रभाव दिसून येईल. या काळात व्यापाऱ्यांना व्यवसायात नुकसानही सहन करावं लागू शकतं. तसेच, नोकरदार लोकांना ऑफिसमध्ये आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. तुम्ही या काळात चुकूनही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू नका, अन्यथा काही मोठ्या समस्या उद्भवतील. या काळात नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर थांबा, कारण हे तुम्हाला महागात पडू शकतं.
मकर रास (Capricorn)
शनीची वक्री स्थिती मकर राशीच्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. या काळात तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. आरोग्याबाबत तुम्ही सावधगिरी बाळगा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आपलं आरोग्य बिघडू शकतं. यावेळी तुम्हाला संयम बाळगण्याची गरज आहे. शनीचा अशुभ प्रभाव वाढल्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या 4 महिन्यांच्या काळात कुणाशीही पैशाचा व्यवहार करू नका.
कुंभ रास (Aquarius)
वक्री शनि कुंभ राशीच्या लोकांसाठी अशुभ परिणाम घेऊन आला आहे. या काळात तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. तुमचं पूर्ण होत आलेलं काम अगदी शेवटच्या क्षणी बिघडू शकतं, त्यामुळे या काळात अत्यंत सावधगिरीने काम करा. कामाच्या ठिकाणी रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुम्हाला तुमची नोकरी गमवावी लागू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :