Shani Vakri 2022 : भगवान महादेवाच्या कृपेने न्यायदेवतेचे स्थान प्राप्त झालेल्या शनिदेव (Shanidev) महाराजांना येत्या 5 जूनपासून वक्री होणार आहे. शनिदेव 5 जूनपासून कुंभ राशीत वक्री होणार आहेत. त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे. शनीची अशुभ दृष्टी टाळण्यासाठी आणि त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी यावर्षी सोमवार, 30 मे, ज्येष्ठ मासातील कृष्ण पक्षातील अमावास्येला शनि जयंतीच्या दिवशी काही विशेष उपाय करणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांचा प्रभाव टाळता येईल.
शनीच्या वक्री चालीमुळे 'या' राशींवर होणार परिणाम
5 जूनपासून कुंभ राशीतील शनीची वक्री जवळपास सर्व राशींवर परिणाम करेल. पण काही राशींवर त्याचा विशेष प्रभाव पडेल.
-मीन राशीला साडेसाती सुरू होईल.
-कुंभ राशीच्या दुसऱ्या चरणात साडेसाती राहील.
-साडेसातीचा शेवटचा टप्पा मकर राशीपासून सुरू होईल.
-कर्क आणि वृश्चिक राशीत ढैय्याची सुरुवात होईल
शनि जयंतीला करा 'हे' उपाय
ज्या राशीत शनि आहे, त्या राशीच्या लोकांना शनीच्या प्रकोपाचा सामना करावा लागत नाही. पण शनीच्या उलट्या हालचालीचा प्रत्येकावर काही ना काही परिणाम होतो. यासाठी 30 मे रोजी येणाऱ्या शनि जयंतीच्या दिवशी भगवान शनिदेव महाराजांची विधिवत पूजा करणे आवश्यक आहे. शनीदेवाला निळा आणि काळा रंग खूप प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन निळ्या रंगाची फुले अर्पण करा. रुद्राक्षाची जपमाळ धारण केल्याने शनीची वाईट नजर देखील टाळता येते. शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाच्या मूर्तीसमोर बसून किंवा शनिदेवाच्या मंदिरात जाऊन शनि मंत्राचा 108 वेळा जप करा. ज्यामुळे शनीची साडेसाती आणि ढैय्याचा प्रभाव कमी होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाच्या बातम्या :
- 'या' राशीच्या लोकांना त्रास देण्यासाठी येणार शनि, चुकूनही करून नका 'हे' काम
- Mars Transit 2022 : 'या' राशींच्या लोकांच्या वाढणार अडचणी
- Astrology : 'या' राशींच्या व्यक्ती पैशांचा करतात योग्य वापर