Shani Uday : ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष महत्त्व आहे. शनीचा 17 मार्चला पहाटे 4 वाजून 40 मिनिटांनी कुंभ राशीत उदय होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखाद्या ग्रहाचा उदय किंवा अस्त होतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर होतो. त्याच प्रमाणे, शनिदेवाच्या (Shani Dev) उदयामुळे काही राशीच्या लोकांना शुभ, तर काहींना अशुभ परिणाम पाहायला मिळतील. कन्या आणि मकरसह 5 राशींच्या लोकांना शनि उदयामुळे नोकरी-व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
शनि उदयामुळे या 5 राशींच्या जीवनात अनेक समस्या येतील. नोकरीत तुम्ही प्रगती करू शकणार नाही, व्यवसायात तुम्हाला तोटा सहन करावा लागेल. व्यवसायात प्रयत्न करुनही तुम्हाला नुकसान होईल. शनि उदयामुळे नेमक्या कोणत्या 5 राशींचे वाईट दिवस सुरू होणार? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
शनीच्या उदयाचा मिथुन राशीच्या लोकांवर विपरीत परिणाम होईल. तुम्ही यावेळी चुकूनही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू नका. अशा कोणत्याही गुंतवणुकीचा विचार तूर्तास बंद करा. तुमचे खर्च अचानक वाढू शकतात आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. तुमच्या कुटुंबात मतभेद वाढू शकतात आणि वाद वाढल्याने तुमचं आरोग्य बिघडू शकतं. करिअरमध्ये नोकरी बदलण्याबाबत यावेळी निर्णय घेऊ नका, हे तुम्हाला महागात पडू शकतं.
कर्क रास (Cancer)
शनि उदयाच्या अशुभ प्रभावामुळे कर्क राशीच्या लोकांना करिअरमध्ये अचानक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. तुमच्या नोकरीत अस्थिरता वाढू शकते आणि तुमचं व्यवसायात मोठं नुकसान होऊ शकतं. फायदेशीर करार तुमच्या हातातून निसटू शकतात. वैवाहिक जीवनातील परस्पर संबंधांवरही परिणाम होऊ शकतो. कुटुंबात भांडणं आणि वाद वाढू शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला नुकसान सोसावं लागू शकतं.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांना शनीच्या उदयाचा फटका बसेल, आर्थिक बाबतीत तुमचं नुकसान होऊ शकतं. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. या काळात कोणतीही नवीन सुरुवात करणं टाळा. कुटुंबातील सदस्यांशी वाद घालणं टाळा. वैवाहिक संबंधांमध्ये अडचणी येऊ शकतात आणि तुमचं आरोग्य बिघडू शकतं. मित्रांसोबतच्या नात्यात काही कारणाने तणाव निर्माण होऊ शकतो. यावेळी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणं आणि करिअरमध्ये कोणतेही नवीन निर्णय न घेणं तुमच्यासाठी चांगलं राहील.
मकर रास (Capricorn)
मकर राशीचा स्वामी शनि हा समजला जातो. त्यामुळे एकीकडे शनीच्या उदयामुळे तुम्हाला फायदाही होईल, पण त्याचा अशुभ प्रभाव वाढल्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना देखील करावा लागू शकतो. तुमच्या घरातील खर्चात प्रचंड वाढ होऊ शकते. पैशाच्या बाबतीत तुम्हाला अडचणी येऊ शकतात. मानसिक अस्वस्थता वाढेल आणि नोकरीच्या बाबतीत मनात एक प्रकारची भीती राहील. या काळात कुणाशीही पैशाचा व्यवहार करू नका.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांना शनीच्या उदयाचा खूप अशुभ परिणाम जाणवेल. तुमच्या खर्चात प्रचंड वाढ होऊ शकते. या काळात फालतू अनावश्यक खर्च टाळा आणि पैसे वाचवण्याचा विचार करा. नोकरी आणि व्यवसायात लोक तुमच्या विरोधात कट रचू शकतात. काळजीपूर्वक वाहन चालवा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. कुटुंबात कोणत्याही प्रकारच्या वादात पडणं टाळा आणि नातेवाईकांशी पैशाचे व्यवहार करू नका. यावेळी तुम्ही कोणत्याही मालमत्तेत पैसे गुंतवू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shani Dev : शनिवारी 'या' 10 गोष्टी चुकूनही करू नका, तर 'या' गोष्टी करा, शनिदेवांची कृपा कायम राहील!