Shani Uday 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनीला (Shani Dev) सर्वात शक्तिशाली ग्रह मानतात. कारण शनी (Lord Shani) हा एकमेव असा ग्रह आहे जो सर्व 12 राशींना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे सर्व राशी शनीपासूनसावध राहण्याचा प्रयत्न करतात. शनी सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. मात्र, 6 एप्रिल रोजी शनीचा उदय होणार आहे. यामुळे अनेक राशींच्या लोकांसाठी हा काळ फार भाग्यशाली असणार आहे. शनीच्या उदयाने कोणत्या राशींच्या लोकांना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी मीन राशीत उदय होणार आहे. तर, आज म्हणजेच 29 मार्च रोजी अस्त अवस्थेत असणार आहे. शनीचा मीन राशीत प्रवेश होणार आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
या राशीच्या कुंडलीत तिसऱ्या आणि चौथ्या चरणाचा स्वामी पंचम चरणात संक्रमण करणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. तसेच, धनसंपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण झालेलं असेल. या काळात तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करु शकता. तुमच्या जीवनात आनंद असेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ महत्त्वाचा असणार आहे. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या समस्या संपतील. तुमच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तुमच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसेल. या काळात तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. जवळच्या नातेवाईकांशी भेटीगाठी वाढतील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय होणं लाभदायक ठरु शकते. या राशीच्या चौथ्या आणि पाचव्या चरणाचे स्वामी सहाव्या चरणात उदय होणार आहे. त्यामुळे तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, जे लोक सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना तुमच्या मनाप्रमाणे नोकरी करता येईल. तुमच्या जीवनात सुरु असलेल्या समस्या हळुहळू संपतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: