Shani Transit 2025: ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायाधीशाचे स्थान आहे. असे म्हटले जाते की ते व्यक्तीच्या कर्मावर आधारित परिणाम देतात. लवकरच शनिदेव नक्षत्र बदलणार आहे, ज्यामुळे काही राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे, जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी?
नुकतीच शनिदेवाने राशी बदलली अन् अनेकांच्या आयुष्यात चमत्कार झाला..
ज्योतिषशास्त्रानुसार,सर्व ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात आणि एका विशिष्ट वेळी नक्षत्र बदलतात, ज्यामुळे देश आणि जगातील सर्व 12 राशीच्या लोकांवर परिणाम होतो. अलीकडेच शनिदेवाने अडीच वर्षांनी राशी बदलली आहे. 29 मार्च 2025 रोजी शनिने कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला, जे या वर्षातील सर्वात मोठे संक्रमण आहे. मीन राशीत प्रवेश केल्यानंतर लवकरच राशीत बदल होणार आहेत. काही राशीच्या लोकांना शनिदेवाच्या या बदलत्या चालीचा खूप फायदा होणार आहे. या काळात लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
शनिदेव नक्षत्र कधी बदलणार?
ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, यावेळी न्याय देवता शनिदेव त्यांच्याच नक्षत्रात म्हणजेच उत्तरा भाद्रपदात 28 एप्रिल रोजी सकाळी 7:52 वाजता प्रवेश करतील. हे 27 नक्षत्रांपैकी 26 वे नक्षत्र मानले जाते. या नक्षत्राचा स्वामी शनिदेव आणि मीन राशी आहे.
या राशींसाठी चांगले दिवस सुरू होतील
मिथुन
ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिदेवाच्या नक्षत्रात होणारा बदल शुभ ठरू शकतो. या काळात मिथुन राशीच्या लोकांना पूर्ण समर्पण आणि मेहनतीने काम करून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. सर्व प्रलंबित कामे किंवा कामातील अडथळे दूर होतील. कोर्ट केसेसमध्ये तुम्हाला दिलासा मिळेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते.
मकर
शनिदेवाच्या नक्षत्रातील बदलामुळे मकर राशीच्या लोकांवर नशीब खूप साथ देईल. या काळात या राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा दिसून येईल. तुम्हाला तुमच्या इच्छित कार्यात यश मिळू शकते. भांडवली गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे, लाभाची शक्यता आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंद राहील. तसेच, तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिदेवाच्या राशीतील बदलामुळे आनंदाची भेट होत आहे. या काळात कुंभ राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. काही जुन्या कर्जातून सुटका मिळेल. तब्येत सुधारेल. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे काहीही खरेदी करू शकता. भांडवली गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत प्रवासाची योजनाही बनवू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.)