Shani Sade Sati: तुमच्या पत्रिकेत शनि आहे. असं ऐकताच भल्याभल्यांच्या अंगावर काटा येतो. कारण शनि एक क्रूर ग्रह मानला जातो. मात्र वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहायला गेलं तर, शनि (Shani Dev) न्यायाचा देव आहे, जो मानवांना त्यांच्या कर्मांनुसार फळ देतो. ज्योतिषशास्त्रात शनीच्या संक्रमणालाही खूप महत्त्व आहे. शनि हा एक ग्रह आहे, जो दीर्घ कालावधीनंतर राशी बदलतो. ज्योतिषशास्त्रानुसार, शनीच्या साडेसातीची (Shani Sade Sati) स्थिती खूप वेदनादायक मानली जाते. या काळात, व्यक्तीला अनेक त्रास आणि दुःख सहन करावे लागतात. त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते आणि त्यांचे प्रगतीपथावर असलेले काम देखील बिघडू लागते.
2038 पर्यंत शनीच्या साडेसतीचा या राशींवर परिणाम होईल.
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या राशीत शनीची साडेसातीची स्थिती असते. त्या राशीवर, त्याच्या पुढील आणि बाराव्या राशीत, साडेसातीचा देखील परिणाम होतो. या तीन राशींमधून प्रवास करण्यासाठी शनीला साडेसात वर्षे लागतात, ज्याला साडेसातीची स्थिती म्हणतात. 2038 पर्यंत शनीच्या साडेसतीचा काही राशींवर परिणाम होईल.
-ज्योतिषशास्त्रानुसार मार्च 2025 मध्ये, शनिने मीन राशीत संक्रमण केलंय. या वर्षी शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा मेष राशीत सुरू झाला आहे. तर, दुसरा टप्पा मीन राशीत असेल आणि शेवटचा टप्पा कुंभ राशीत असेल.
कुंभ - शनीची कुंभ राशीवरील साडेसाती 3 जून 2027 पर्यंत राहील.
मेष - मार्च 2025 मध्ये शनीचे संक्रमण होताच साडेसाती मेष राशीत सुरू झाली आणि ती 2032 पर्यंत राहील.
वृषभ -2027 मध्ये शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा वृषभ राशीत सुरू होईल.
मिथुन - 8 ऑगस्ट 2029 रोजी मिथुन राशीसाठी शनीची साडेसाती सुरू होईल आणि ऑगस्ट 2036 मध्ये संपेल.
कर्क - मे 2032 मध्ये कर्क राशीसाठी शनीची साडेसाती सुरू होईल, जी 22 ऑक्टोबर 2038 पर्यंत राहील.
-अशा प्रकारे, 2025 ते 2038 पर्यंत, कुंभ, मीन, मेष, वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव राहील.
'या' राशींची शनीच्या साडेसातीतून सुटका
ज्योतिषशास्त्रानुसार, मार्च 2025 मध्ये शनीचा मीन राशीत प्रवेश झाल्यावर, मकर राशीतील शनीची साडेसती संपु्ष्टात आली आहे. यासोबतच कर्क आणि वृश्चिक राशीवरील शनीची ढैय्या देखील संपली आहे.
शनीच्या साडेसातीसाठी काही ज्योतिषीय उपाय
- जर तुम्हाला शनीची साडेसाती असेल, तर तुम्ही काही सोप्या उपायांनी त्याचे अशुभ परिणाम कमी करू शकता:
- शनिवारी भगवान शनीची पूजा करा.
- दररोज हनुमान चालीसा पाठ करणे देखील फायदेशीर आहे.
- तसेच, तुमच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी घाला.
- शनिवारी भगवान शनीला तीळाचे तेल अर्पण करा.
- काळ्या मुंग्यांना मध आणि साखर खाऊ घालल्याने देखील शनिदेव प्रसन्न होतात.
हेही वाचा :
Astrology: आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी द्विपुष्कर योगासह जुळले शुभ संयोग; 'या' 5 राशींचे टेन्शन संपणार, बाप्पा आणि देवीची मोठी कृपा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)