Gautami Patil Navratri Special Song Video: नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) म्हणजे, लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत. गौतमीची अदा, तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते अगदी वेडे-पिसे होतात. तिचे अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात. अशाच एका नव्या व्हिडीओमधून गौतमी पाटील प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नवरात्रीनिमित्त गौतमी पाटीलचं नवं गाणं (Gautami Patil New Song) प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. नव्या गाण्यात गौतमी देवीचा गोंधळ सादर करताना दिसतेय.                           

गौतमी पाटीलचं नवरात्री स्पेशन गाणं चाहच्यांना खूपच आवडलं आहे. या गाण्यात गौतमी अंबाबाईचा गोंधळ घालतेय. गौतमीच्या नव्या गाण्यावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. तसेच, अनेक चाहते कमेंट करुन गौतमीला नवरात्रीच्या शुभेच्छा देत आहेत. गौतमीच्या या गाण्याचं दिग्दर्शन रोहित जाधव यांनी केलं आहे. तर, गाण्याला संगीत गायक चंदन कांबळे यांनी दिलं आहे. Saregama Marathi या युट्यूब चॅनलवर गौतमीचं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर हे गाणं जोरदार व्हायरल होत आहे.              

गौतमीनं या गाण्यात देवीचा गोंधळ घालतेय. गौतमी पाटीलनं हिरवी साडी नेसली आहे. तसेच, पारंपारिक दागिने घातले आहेत. एकंदरीत पारंपारिक वेशभूषेत गौतमी पाटील दिसतेय. तर, गौतमीनं मळवट भरला आहे. तसेच, गौतमीनं तिचे केस मोकळे सोडले आहेत. गौतमी मनोभावे देवीला साकडं घालताना दिसतेय.                        

दरम्यान, गौतमीचं गाण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवरात्रीनिमित्त केलेलं हे गाणं गौतमीच्या तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर केलं आहे. चाहत्यांना गौतमीचं हे गाणं खूप आवडत आहे. 

पाहा गौतमीचं गाण : 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Rishabh Shetty Kantara Chapter 1 Trailer Out: पंजूर्ली देवाचा इतिहास अन् रहस्यमयी, गूढ कहाणी; ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर 1'चा शहारे आणणारा ट्रेलर रिलीज