Continues below advertisement

Shani Sade Sati and  Dhaiyya : ज्योतिष शास्त्रानुसार, शनि (Shani Dev) ग्रहाला अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रहाचं स्थान देण्यात आलं आहे. शनिदेवाला कर्मफळदाता आणि न्यायदेवता म्हणतात. असं म्हणतात की, व्यक्तीच्या जीवनात येणारे सुख-दुख, यश-अपयश, आरोग्य, नोकरी या सर्वांचं नियंत्रण शनिदेवाच्याच हातात असते. यासाठीच शनिदेवाचं संक्रमण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर फार गंभीर परिणाम सोडून जातो.

सध्या शनि देव मीन राशीत संक्रमण करतायत. तर, 2026 मध्येसुद्धा शनी मीन राशीतच स्थित असणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांना सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही परिणामांचा अनुभव येऊ शकतो. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा प्रभाव असणार आहे. या काळात तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही घेतलेल्या नवीन कामात तुम्हाला अनेक अडथळे येतील. तसेच, या काळात तुम्ही घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुम्हाला धनहानीचा सामना करावा लागू शकतो. महत्त्वाच्या कामात अडथळे येतील.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांवर नवीन वर्षात साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु असणार आहे. हा सर्वात कठीण काळ मानला जातो. या दरम्यान तुम्हाला शारीरिक थकवा जाणवेल. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. तसेच, शारीरिक बरोबरच तुम्हाला मानसिक तणावाचा देखील सामना करावा लागणार आहे. घरातील कामांच्या प्रती तुमच्या जबाबदारी वाढतील. तसेच, तुमच्या करिअरला फारसा वेग लागणार नाही.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

नवीन वर्ष 2026 मध्ये कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु असेल. या काळात तुम्हाला तुमच्या जुन्या गोष्टींमधून जास्त यश मिळणार नाही. कोर्ट कचेरीच्या संदर्भातील कामं सुरु राहतील. तसेच जुने वादविवाद पुन्हा सुरु होतील. जर तुम्ही या काळात नोकरी बदलीचा विचार करणार असाल. तर हा तुमच्यासाठी योग्य काळ नाही.

शनिच्या साडेसाती आणि ढैय्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी करा 'हे' उपाय

  • शनिवारच्या दिवशी शनिदेवापुढे दिवा लावावा. तसेच, शनिच्या मंत्राचा जप करावा.
  • शनि चालीसा आणि शनि स्तुतीचं पठण करावं.
  • पिंपळाच्या झाडाला जल आणि दूध अर्पण करा.
  • काळे तीळ, उडीद डाळ किंवा काळा कपडा असल्यास शनिदेवाला तो दान करा.

हे ही वाचा :                                     

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Gemini Yearly Horoscope 2026 : मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष ठरणार गेमचेंजर; करिअर, शिक्षण, आरोग्य नेमकं कसं असणार? वार्षिक राशीभविष्य