Shani Sade Sati 2026: 2026 वर्ष जवळ येतोय, तसतशी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचतेय. नवीन वर्ष नवीन उत्साह घेऊन येतो. अशात, प्रत्येकजण त्यांचे भविष्य जाणून घेण्यास उत्सुक असतो, ज्योतिषशास्त्रानुसार, शनीची साडेसाती किंवा ढैय्याची त्यांच्या राशीवर काय स्थिती आहे हे जाणून घेण्यास उत्सुक असतो. शनीचा प्रभाव सर्वज्ञात आहे; साडेसाती हा शनिचा एक प्रमुख प्रभाव मानला जातो. ढैय्या हा एक लघु प्रभाव मानला जातो. शनिच्या साडेसातीचा काळ हा अत्यंत कठोर असतो, त्याच्या टप्प्यानुसार हा प्रभाव कमी जास्त होतो, जाणून घेऊया शनि साडेसातीचा प्रभाव 2026 वर्षात कोणत्या राशींवर असेल...
शनीच्या साडेसातीच्या प्रभावाचा कोणावर परिणाम होईल? (Shani Sade Sati 2025)
कुंभ (Aquarius)
साडेसातीचा शेवटचा टप्पा असेल.शनीचा प्रभाव - मानसिक ताण, कामात विलंब, कौटुंबिक तणाव आणि आरोग्यावर परिणाम.उपाय - हनुमान चालीसाचे पठण करणे, शनी अमावस्येला तेल दान करणे आणि शनिवारी काळे तीळ दान करणे.
मीन (Pisces)
साडेसातीचा मधला टप्पा (सर्वात कठीण) मानला जाईल.परिणाम - करिअरमधील कठीण निर्णय, आर्थिक नुकसानाची भीती, शत्रू वाढणे, नातेसंबंधांमध्ये दुरावा.उपाय - शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे, शनिस्तोत्राचे पठण करणे, गरिबांना काळे कपडे आणि धान्य दान करणे.
मेष (Aries)
साडेसातीचा प्रारंभिक टप्पा असेल.परिणाम - नोकरी बदलणे, कौटुंबिक कलह आणि आरोग्यातील चढउतार.उपाय - हनुमानाची पूजा करणे, शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे, काळ्या कुत्र्याला किंवा गायीला भाकरी अर्पण करणे.
2026 मध्ये ढैय्याचे परिणाम
सिंह (Leo)
शनीचे आठवे संक्रमण परिणाम - अवांछित खर्च, प्रवासातील अडचणी आणि आरोग्यावरील परिणाम.उपाय - ओम शं शनैश्चराय नम: जप करणे, शनिवारी काळे चणे दान करणे.
धनु (Sagittarius)
शनीचे चौथे संक्रमणपरिणाम - कौटुंबिक कलह, कायमस्वरूपी मालमत्तेत अडथळे आणि मानसिक अस्वस्थता.उपाय - काळी घोड्याची नाल घालणे, निळे कपडे दान करणे आणि हनुमान मंदिरात जाणे.
शनिच्या प्रभावापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी उपाय
- शनिवारी शनिदेवाची पूजा करा.
- शनिवारी तेल, तीळ, लोखंड आणि काळ्या वस्तूंचे दान करा.
- हनुमानाचे स्मरण करणे, हनुमान चालीसा पाठ करणे अत्यंत फायदेशीर आहे.
- गरीब, असहाय्य लोकांची सेवा करणे आवश्यक आहे.
- न्यायी, संयमी आणि कष्टाळू जीवनशैली अंगीकारणे.
- शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे आणि दिवा लावणे फायदेशीर आहे.
हेही वाचा
Shani Margi: आजपासून 3 राशींनी कोणतीच गोष्ट हलक्यात घेऊ नका! कालच शनिने दिशा बदललीय, नोकरी-व्यवसायात अडथळे, पैसा अचानक जाण्याचे संकेत..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)