Ardh Kendra Yog 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य (Surya) दर महिन्याला राशी परिवर्तन करतो. त्यामुळे या कालावधीत सूर्याची कोणत्या ना कोणत्या ग्रहाबरोबर युती किंवा संयोग जुळून येतो. दृष्टी पडते. यामुळे अनेक शुभ-अशुभ राजयोग निर्माण होतात. सध्या सूर्य ग्रह वृश्चिक राशीत विराजमान आहे. त्यानंतर 8 डिसेंबर रोजी सूर्य ग्रह मकर राशीत विराजमान राहून यम ग्रहाबरोबर संयोग जुळून आल्याने अर्धकेंद्र योग (Yog) निर्माण होणार आहे.
सूर्य आणि यम ग्रहाबरोबर युती निर्माण होऊन अर्ध केंद्र योग काही राशींसाठी शुभकारक ठरणार आहे. या राशींचा समाजात मान वाढेल. त्यामुळे या लकी राशी कोणत्या आहेत ते पाहूयात.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, येत्या 8 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजून 1 मिनिटांनी सूर्य आणि यम ग्रह एकमेकांच्या 45 डिग्री अंतरावर असतील. यामुळे अर्धकेंद्र योग निर्माण होणार आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
या राशीच्या दुसऱ्या चरणातील स्वामी होऊन सूर्य ग्रह पंचम भावात संक्रमण करणार आहे. त्याचबरोबर यम ग्रह सातव्या चरणात विराजमान आहे. त्यामुळे या राशीसाठी अर्धकेंद्र योग फार लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या पार्टनरबरोबर तुमचे चांगले संबंध निर्माण होतील. व्यवसायात तुमची प्रगती होईल. तुमच्या करिअरमध्ये प्रत्येक क्षेत्रात तुम्ही प्रगतीच्या मार्गावर चालाल. तसेच, मुलांच्या संदर्भात तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते.
धनु रास (Saggitarius Horoscope)
या राशीच्या नवव्या चरणाचा स्वामी सूर्य ग्रह बाराव्या चरणात स्थित असते. तर, यम दुसऱ्या चरणात असणार आहे. त्यामुळे तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ पाहायला मिळेल. परदेशात जाण्याची संधी लवकरच चालून येईल. तसेच, तुमच्या कर्माचं तुम्हाला पुण्य फळ मिळेल. तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर तीही या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
या राशीच्या सातव्या चरणाचा स्वामी ग्रह सूर्य दहाव्या आणि यम ग्रह बाराव्या चरणात स्थित असतील. या काळात सूर्य-यमचा अर्धकेंद्र योग अनेक राशींसाठी खास ठरणार आहे. करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती होईल. तसेच, धनसंपत्ती भरभराट होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)