Shani Sade Sati 2025: हिंदू धर्मात शनिदेवाला कर्माचा दाता मानले जाते. जेव्हा शनिदेव एखाद्याला शिक्षा करतात, तेव्हा त्याच्या आयुष्यात साडेसाती आणि ढैय्या यांचे चक्र सुरू होते. साडेसाती ही 7 वर्षांची असते, तर ढैय्या फक्त दोन वर्षांची असते. हा काळ खूप वेदनादायक असतो. विशेषतः साडेसातीच्या दीर्घ काळात, एखाद्या व्यक्तीला दुःखाच्या मोठ्या काळातून जावे लागते. ज्योतिष तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सध्या कोणत्या राशीची साडेसाती संपतेय, तसेच आयुष्यात साडेसाती कधी येते. एखाद्या व्यक्तीला किती वेळा आणि कोणत्या वेळी साडेसाती सहन करावी लागते? जाणून घेऊया...
शनिदेवांची साडेसाती आयुष्यात किती वेळा येते?
हिंदू धर्मात शनिदेवाला न्यायप्रेमी देव मानले जाते. जेव्हा शनिदेव एखाद्याला शिक्षा देतात तेव्हा त्याच्या आयुष्यात साडेसती सुरू होते. अशात, आपण जाणून घेऊया की साडेसाती आणि ढैय्या आयुष्यात किती वेळा येते?
साडेसाती किती वेळा येते?
- साडेसाती कोणत्याही एका राशीत येत नाही.
- एकाच वेळी अनेक राशी त्याच्या प्रभावाखाली येतात.
- साडेसातीच्या प्रभावामुळे काही राशींना 7 वर्षे शनिचा त्रास सहन करावा लागतो.
- ज्या राशीत शनि बसलेला असतो, त्या राशीत एक राशी पुढे आणि एक राशी मागे देखील त्याच्या प्रभावाखाली येते.
- 12 राशींमध्ये फिरण्यासाठी शनिला 30 वर्षे लागतात
- तो प्रत्येक राशीत अडीच वर्षे राहतो.
- अशात, ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात साडेसाती निश्चितपणे 3 वेळा येते.
- म्हणजे दर 30 वर्षांनी एखाद्या व्यक्तीला शनि साडेसातीचे चक्र भोगावे लागते.
साडेसातीचा प्रभाव कसा आणि काय असतो?
- साडेसाती सुरू झाल्यावर, शनि दंडक बनतात आणि व्यक्तीच्या कर्मांचा हिशोब घेतात.
- साडेसाती दरम्यान, व्यक्तीला आर्थिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या त्रास सहन करावा लागतो.
- साडेसाती शनि अडीच वर्षांच्या तीन अंतराने येते. पहिल्यामध्ये, आर्थिक संकट येते.
- त्याच वेळी, दुसरा आणि तिसरा कालावधी कार्यक्षेत्र, कौटुंबिक जीवन आणि आरोग्यावर परिणाम करतो.
'या' राशीचा शनीची साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू...
ज्योतिषशास्त्रानुसार पाहिल्यास सध्या, शनीची साडेसतीचा शेवटचा टप्पा कुंभ राशीत सुरू आहे, म्हणजेच यावेळी शनीची साडेसाती कुंभ राशीत आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, शनीची साडेसाती जाता जाता कुंभ राशीसाठी खूप शुभ आणि फायदेशीर परिणाम आणणार आहे. ज्योतिषीनुसार, कुंभ राशीतील शनीची साडेसाती संपत असल्याने, या राशीच्या जातकांना काही फायदे मिळणार आहेत, जे कुटुंबापासून ते करिअरपर्यंत दिसून येतील. अशा परिस्थितीत, कुंभ राशीच्या जातकांसाठी उतरत्या शनीची साडेसाती कशी शुभ राहणार आहे, ते जाणून घेऊया...
कुंभ राशीची साडेसाती शेवटच्या टप्प्यात
ज्योतिषशास्त्रानुसार, 29 मार्च 2025 रोजी रात्री 9:44 वाजता शनिने कुंभ राशीतून मीन राशीत संक्रमण केलय. या दिवसापासून, साडेसातीचा शेवटचा टप्पा कुंभ राशीत सुरू होईल. शनिदेव 3 जून 2027 पर्यंत मीन राशीत राहतील. त्यानंतर, ते मीन राशीतून मेष राशीत संक्रमण करतील. शनिदेव वक्री होतील आणि 20 ऑक्टोबर 2027 रोजी पुन्हा मीन राशीत संक्रमण करतील. त्याच वेळी, ते 23 फेब्रुवारी 2028 रोजी मेष राशीत संक्रमण करतील. या दिवशी, कुंभ राशीच्या लोकांना साडेसातीच्या घटनेपासून पूर्ण आराम मिळेल.
करिअर बदलेल
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीत शनीची साडेसाती लवकरच संपणार आहे, अशात करिअरमधील अडथळे आता दूर होतील. कुंभ राशीच्या लोकांना साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यामुळे करिअरमध्ये चांगले परिणाम मिळतील. करिअरमध्ये जलद वाढ होईल आणि परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांनाही पुढे जाण्याची संधी मिळेल.
नोकरी आणि व्यवसायात बदल
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांना शेवटच्या साडेसातीचा खूप फायदा होणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळतील, नवीन नोकरीची शक्यता आहे किंवा नोकरीत बदल चांगल्या वाढत्या उत्पन्नाच्या स्वरूपात देखील येऊ शकतो. व्यावसायिकांना चांगला सौदा मिळू शकतो. जर तुमचा व्यवसाय आतापर्यंत स्थिर होता, तर तो आता सुरू होईल.
आरोग्यात बदल
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीत शनी साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात आरोग्याचे फायदे देखील दिसून येतील. जे लोक त्यांच्या आरोग्याबद्दल चिंतेत आहेत, जुन्या आजाराने ग्रस्त आहेत किंवा कोणतेही औषध काम करत नाही, त्यांना आता आरोग्य लाभ होतील आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने त्यांना आरोग्यात आराम मिळेल. शनिदेवाच्या साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यात आरोग्यात सुधारणा होईल आणि शरीर निरोगी होईल.
हेही वाचा :
Hartalika 2025: यंदाची हरतालिका 'या' 3 राशींचे भाग्य घेऊन येतेय! जबरदस्त नवपंचम राजयोगाचा योगायोग, बॅंक बॅलेंस वाढेल, पैसा कायमचा येणार..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)