Horoscope Today 21 August 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 21 ऑगस्ट 2025, आजचा वार गुरूवार आहे. आज श्रावणातील शेवटचा गुरूवार असल्याने आजचा दिवस खास आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज महिलांना संसारात तडजोड करावी लागेल, घरातील लोकांच्या मताचा आदर करावा लागेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज आपली रसिकता चोखंदळपणे जपत संयम आणि संतुलित विचाराचा पाठपुरावा कराल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज राग नियंत्रणात ठेवावा लागणार आहे, घरातील लोकांच्या मताचा आदर करावा लागेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज थोडा अस्थिर आणि चंचल मनाला सामोरे जावे लागेल, मनशांती मिळवायची असेल तर ध्यान धारणा करावी
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज इष्ट देवतेचा जप निश्चित शांती मिळवून देईल, जवळच्या मैत्रिणींच्या लहरी वागणुकीमुळे त्रास होईल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज वडिलोपार्जित घराचे प्रश्न सुटण्याच्या मार्गावर येतील, कारखानदारांनी आळस सोडून स्वतंत्र वृत्तीने कामे करून घ्यावीत
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज जे काम कराल, त्यातून तुमची वेगळी प्रतिमा दिसून येईल, ठरवलेल्या कामात उशीर झाल्यामुळे नाराज व्हाल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज काळ आणि कामाच्या वेळेचे गणित नियोजनबद्ध रीतीने बसवल्यास फायदा होईल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज महिला करारी बनतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी क्रांती करून दाखवावीशी वाटेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज इतरांशी मिळून मिसळून वागण्याच्या स्वभावामुळे जवळच्या लोकांची मने जिंकून घ्याल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज ज्यांना परदेशगमनाची इच्छा आहे. त्यांनी तसे प्रयत्न करायला हरकत नाही
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज तुमच्या अंगी योग्यता असूनही नोकरीमध्ये प्रमोशनसाठी किंवा काही फायदे मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.
हेही वाचा :
Lucky Zodiac Signs: 21 ऑगस्टपासून 'या' 5 राशींचे अच्छे दिन सुरू! दत्तगुरूंचे मोठे पाठबळ, शिवरात्रि - गुरूपुष्याचा अद्भुत योगायोग धनलाभ होणार
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)