Shani Rashi parivartan 2022 : कर्मफळ देणारा शनि ग्रह 29 एप्रिल रोजी कुंभ राशीतून भ्रमण करेल. 30 वर्षांनंतर शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या राशी बदलामुळे व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो.  


29 एप्रिल रोजी शनी कुंभ राशीत प्रवेश करेल आणि 5 जून रोजी परत मागे जाईल. यानंतर 12 जुलै रोजी मकर राशीत जाईल आणि 17 जानेवारी 2023 पर्यंत येथे राहील. शनीच्या राशी बदलाने मीन राशीच्या लोकांवर साडेसाती सुरू होईल. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात. तर दुसरीकडे धनु राशीच्या ज्या लोकांना गेल्या सात वर्षांपासून समस्यांचा सामना करावा लागत होता त्यांना आता आनंद मिळणार आहे.


कुंभ राशीतील शनीचे संक्रमण धनु राशीच्या लोकांवर चालत असलेल्या शनीच्या अर्धशतकातून सुटका होईल. यासोबतच त्यांना धनलाभ होण्याचे चांगले संकेत आहेत. या राशीच्या आजारी लोकांना आजारापासून मुक्ती मिळेल आणि जीवनात सुख, समृद्धी आणि संपत्तीचा लाभ होईल. धनु राशीच्या लोकांना त्यांचे नशीब त्यांना पूर्ण साथ देईल. याबरोबरच ज्यांच्या लग्नात अडथळे येत होते ते अडथळे आता दूर होतील.


दरम्यान, 25 एप्रिल 2022 रोजी बुधाची राशी बदलणार आहे. तो मेष राशीतून निघून वृषभ राशीत प्रवेश करेल. या राशीच्या या बदलामुळे बुधाची शुभता वाढेल. यामुळे मेष, वृषभ, कर्क , सिंह, कन्या, धनु  या
सहा राशींचे भाग्य खुलणार आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)


महत्वाच्या बातम्या


Mercury Transit 2022 : 25 एप्रिलपासून चमकणार 'या' राशीच्या लोकांचे नशीब, धन-व्यवसायात मिळेल मोठे यश


Horoscope Today, April 25, 2022 : वृषभ, कन्यासह ‘या’ राशींना नोकरीत मिळणार आनंदाची बातमी! जाणून घ्या आजचं राशीभविष्य


Solar Eclipse 2022 : 'या' दिवशी होणार वर्षातील पहिले सूर्यग्रहण; कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या सविस्तर