Shani Rahu Yuti 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, अवघ्या काही दिवसांतच न्यायदेवता शनी (Shani Dev) मीन राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी शनी राहुसह अशुभ युती बनवणार आहे. शनी आणि राहूच्या (Rahu) युतीने मीन राशीत पिशाच योग जुळून येणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शनी आणि राहूसारख्या क्रूर ग्रहांची युती इतर राशींसाठी फार विनाशकारी मानली जाते. यामुळे तुमच्या करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच, गंभीर आजार देखील उद्भवू शकतात. शनी-राहूच्या अशुभ युतीने कोणकोणत्या राशींना नुकसान सहन करावं लागू शकतं या संदर्भात सविस्तर जाणून घेऊयात. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी शनी-राहूच्या युतीचा हा काळ फार कठीण असणार आहे. या काळात कर्क राशीच्या लोकांच्या समस्यात वाढ होऊ शकते. तसेच, तुम्हाला कामाच्या निमित्ताने यात्रेला जावं लागू शकतं. याचा तुमच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. तसेच, जे लोक खाजगी नोकरी करतात त्यांना या काळात सावध राहण्याची गरज आहे. जर तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची असेल तर या कालावधीत करु नका. अनावश्यक प्रवास टाळा. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांनी या काळात कोणताही निर्णय विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे. तसेच, या काळात तुम्हाला विनाकारण नुकसान सहन करावं लागू शकतं. तुम्हाला या काळात फार मेहनत करावी लागेल. तसेच, तुम्ही कर्जबाजारी देखील होऊ शकता. तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे या काळात अनावश्यक खर्च टाळा. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात सावध राहण्याची गरज आहे. या काळात तुमच्या कामात मतभेद होऊ शकतात. या काळात वाईट मार्गाने पैसा कमावू नका. तसेच, प्रेमसंबंधांच्या बाबतीत तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे. तसेच, नातेसंबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो. या काळात वाहन चालवताना काळजी घ्या. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सतर्क असण्याची गरज आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :                                                


Mauni Amavasya 2025 : बाकी काही नको, अमावस्येला करा फक्त 'हे' 5 उपाय; पितृदोषापासून कायमची मिळेल मुक्ती