Shani Rahu Transit 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, शनि (Shani) आणि राहू (Rahu) ही अशी दोन नावं आहेत. ज्यांचं नाव काढताच भल्याभल्यांना घाम फुटतो, कारण वैदिक ज्योतिष शास्त्रात, हे ग्रह अत्यंत कठोर मानले जातात. मात्र 2026 मध्ये हे दोन ग्रह काही राशींना मोठे सरप्राईझ देणार आहेत. 2026 च्या सुरूवातीला अनेक प्रमुख आणि लहान ग्रह त्यांच्या राशी बदलतील. ज्यामध्ये न्यायाधीश शनि आणि मायावी ग्रह राहूची नावे देखील आहेत. ज्यामुळे 3 राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता ज्योतिषींनी वर्तविली आहे. जाणून घ्या त्या भाग्यशाली राशींबद्दल...
शनि-राहूची चाल बदलणार, 3 राशींना मोठा फायदा..
ज्योतिषशास्त्रानुसार, मार्च आणि एप्रिल महिन्यात शनिदेवाचा अस्त आणि उदय होईल. त्याच वेळी राहू ग्रह कुंभ राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करेल. या दोन ग्रहांच्या चालीतील बदलामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. तसेच, या राशींना अचानक आर्थिक लाभासोबत प्रगतीची शक्यता आहे. अडकलेले पैसे तिथे मिळू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार, जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी...
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 2026 मध्ये शनि, फळ देणारा आणि मायावी ग्रह राहुच्या चालीमध्ये बदल होणार आहे, ज्यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते.
मकर (Capricorn)
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि आणि राहूच्या चालीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचे धैर्य आणि शौर्यही वाढेल. त्याच वेळी, बेरोजगार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तुमचा आदरही होईल. जुनी गुंतवणूक किंवा पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आणि समाजातही तुमची प्रतिष्ठा वाढेल. तसेच या काळात केलेल्या प्रयत्नांचा चांगला फायदा होईल.
तूळ (Libra)
ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या लोकांसाठी शनि आणि राहूच्या चालीतील बदल सकारात्मक सिद्ध होऊ शकतात. यावेळी तुम्ही वाहन आणि मालमत्ता घेऊ शकता. तसेच, कोर्ट केसेसमध्ये तुम्हाला विजय मिळू शकेल. यावेळी तुम्ही तुमच्या गुप्त शत्रूंवर विजय मिळवाल. नवीन प्रकल्प किंवा व्यवसायातही तुम्हाला फायदा होईल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शहाणपणाने आणि समंजसपणाने योग्य वेळी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. त्याचबरोबर ज्या लोकांचा व्यवसाय रिअल इस्टेट, प्रॉपर्टी आणि रिअल इस्टेटशी संबंधित आहे त्यांना चांगला लाभ मिळू शकतो.
मिथुन (Gemini)
ज्योतिषशास्त्रानुसार, शनीचा उदय आणि राहूचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. तसेच व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. नोकरदारांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते. तिथेच तुमच्या मेहनतीला फळ मिळेल. तसेच, मोठ्या नफ्याचे मार्ग खुले होतील. कुटुंबात सुख-समृद्धीचे वातावरण राहील. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
हेही वाचा
Shani Margi 2025: तब्बल 30 वर्षांनी 3 राशींना खरं सुख मिळणार! शनि होतोय मार्गी, 2027 पर्यंत आशीर्वाद कायम, हातात खेळेल पैसा..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)