Shani Margi 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) कर्मफळदाता आणि न्यायदेवता म्हणतात. यासाठीच नवग्रहांमध्ये शनिला विशेष स्थान देण्यात आलं आहे. सध्या शनी महाराज मीन राशीत वक्री अवस्थेत विराजमान आहे. तर, जून 2027 पर्यंत शनी (Shani Margi) याच राशीत भ्रमण करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, जवळपास 138 दिवसांपर्यंत शनीच्या वक्री चालीनंतर शनी 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत शनी मार्गी होणार आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार, शनीच्या मार्गी होण्याने अनेक राशींच्या लोकांसाठी हा शुभ काळ असणार आहे. तर, ज्या राशींवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव आहे अशा राशींच्या लोकांनी या काळात सतर्क राहणं गरजेचं आहे. शनीच्या मार्गीमुळे कोणकोणत्या राशींना सावधान राहण्याची गरज आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांचा सध्या साडेसातीचा काळ सुरु आहे. शनीच्या मार्गी अवस्थेमुळे या राशीच्या लोकांना मिश्रित स्वरुपाचा परिणाम पाहायला मिळणार आहे. या काळात कोणताही निर्णय घेताना घाईगडबड करु नका. अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागणार आहे. कुटुंबात छोट्या-छोट्या गोष्टींवरुन तुमचे मतभेद होऊ शकतात. यासाठीच तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे. शनीच्या मार्गी अवस्थेमुळे तुम्हाला मानसिक तणाव, आर्थिक नुकसान आणि कर्ज वाढण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. तसेच, या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याची देखील विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कुटुंबात वादाची स्थिती देखील निर्माण होण्याची शक्यता आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांवर सध्या शनीच्या साडेसातीचा प्रभाव सुरु आहे. तसेच, या काळात तुमच्यावर आर्थिक संकट आणि आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. नोकरदार वर्गातील लोकांना या काळात जास्त मेहनत करण्याची गरज आहे. तसेच, व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला जास्त सावधानता बाळगण्याची गरज आहे. तसेच, या काळात घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)