Shani Margi 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 वर्षाच्या शेवटी ग्रहांच्या चालीत मोठा बदल दिसून येणार आहे. कर्मफळदाता शनीचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. सध्या शनी (Shani Margi 2025) मीन राशीत वक्री स्थितीत विराजमान आहे. तर, नोव्हेंबर महिन्यात शनी मार्गी होणार आहे. म्हणजेच शनी सरळ चाल चालणार आहे. यामुळे काही राशींसाठी (Zodiac Signs) हा काळ भाग्याचा असणार आहे. तर, यामुळे काही राशींच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. तर, या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी शनीच्या मार्गीचा हा काळ फार शुभकारक असणार आहे. कारण शनीदेव या राशीच्या साहस आणि पराक्रम भावात वक्री होणार आहे. त्यामुळे या दरम्यान तुमच्या साहसात चांगली वाढ झालेली दिसेल. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, भावा-बहि‍णींचा चांगला पाठिंबा तुम्हाला मिळेल. तुम्हाला नोकरीत प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी शनीच्या मार्गीचा काळ फार सकारात्मक असेल. या राशीच्या करिअर आणि कर्मभावात शनी मार्गी होणार आहे. त्यामुळे तुम्ही जे काही कार्य हाती घ्याल ते निर्विघ्नपणे पार पडेल. तसेच, तुम्ही घेतलेले निर्णय यशस्वी होतील. या काळात तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात देखील करु शकता.उत्पन्नाची नवी साधनं तुमच्यासमोर उपलब्ध होतील. शनीच्या कृपेने तुमच्या पंखांना चांगलं बळ मिळेल. नवीन कार्य करण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. 

Continues below advertisement

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी शनिच्या मार्गीचा हा काळ फार अनुकूल असणार आहे. कारण या राशीच्या सहाव्या स्थानी शनि मार्गी होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून तुमचे कोर्ट कचेरीच्या संदर्भातील जे वाद सुरु होते ते हळुहळू मिटतील. या काळात एखादी शुभवार्ता तुम्हाला मिळेल. तसेच, जर तुम्हाला एखादी प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी देखील हा काळ फार शुभकारक असणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :           

Triekadash Yog 2025 : पुढच्या 48 तासांत नशिबाचे फासे पलटणार, बुध-यम ग्रहाच्या युतीने 'या' राशींचं होणार चांगभलं, सुवर्णकाळ सुरु