Horoscope Today 29 October 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 29 ऑक्टोबर 2025, आजचा वार बुधवार आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीविठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज विवाहाची इच्छा असणाऱ्यांना आपल्या जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य मिळेल घरात आणि घराबाहेर सूत्रबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने वागाल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज आज महिला जास्तच कार्यरत होतील, फायदा तोट्याचा सूक्ष्म हिशोब आज करणार नाही
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज लोकांमध्ये मानसन्मान मिळेल, घरामध्ये काही ठोस निर्णय घ्याल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज तुमच्या काही धाडसी निर्णयांना कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कष्ट पडले तरी गोडी मात्र निश्चित लागेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज परदेशी प्रवासाचे योग येतील, फक्त कागदपत्रे तयार करण्यासाठी जास्त त्रास पडेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज तज्ञांच्या सल्ल्याने एखादी गुंतवणूक करायला हरकत नाही, व्यवसायात खूप वेगवेगळ्या कल्पना सुचतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज आपले विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा कराल, एखाद्या गोष्टीच्या निमित्ताने घरातील वातावरण आनंदी राहील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज महिला जरा जास्तच शिस्तप्रिय राहतील, इतरांच्या मानाने व्यावहारिक दृष्टी कमी राहील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज नुसती बोलबच्चन गिरी करून काम भागणार नाही, त्या बोलण्याला वास्तवाचा आधार लागेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज ज्या गोष्टीसाठी काम करता त्याचा लाभ मिळेलच, पण त्याबरोबर प्रतिष्ठाही मिळेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज गुप्त शत्रूंचा थोडा त्रास होईल, पण सावधगिरीने काम केले तर यशस्वी व्हाल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज एक ना धड भराभर चिंध्या या म्हणीप्रमाणे कामाची पद्धत न ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.
हेही वाचा>>
Lucky Zodiac Signs: 29 ऑक्टोबर तारीख लाखात एक! 'या' 5 राशींकडे पैसा चुंबकासारखा खेचला जाणार, जबरदस्त पाठोपाठ योग बनतायत...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)